Gold Price Today : सोनं स्वस्तात खरेदी करण्याचा ‘गोल्डन चान्स’..! जाणून घ्या आजचा चांदीचाही दर

WhatsApp Group

Gold and Silver Price Today : आज १० ऑक्टोबर रोजी जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. आंतरराष्‍ट्रीय बाजारात सोन्यापेक्षा चांदीची किंमत अधिक घसरली आहे. भारतीय वायदे बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात हाच कल दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याची किंमत ०.७५ टक्क्यांनी घसरली आहे. आज चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली असून एमसीएक्सवर ती २.०४ टक्क्यांनी घसरली आहे.

सोमवारी, MCX वर २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सकाळी ९.१० वाजता ३९२ रुपयांनी घसरून ५१,५८५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. सोन्याचा भाव आज ५१,६८५ रुपयांवर उघडला गेला. त्याचवेळी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीचा दर १२३९ रुपयांनी घसरून ५९,५४६ रुपये प्रति किलो झाला आहे. आज चांदीचा व्यवहार ६०,००० पासून सुरू झाला. एकदा किंमत ५९,५०१ रुपये झाली. पण, काही काळानंतर त्यात थोडी सुधारणा झाली आणि किंमत ५९,५४६ रुपयांवर आली.

हेही वाचा – “एक धुरंधर नेतृत्व…”, CM एकनाथ शिंदेंची मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ

भारतीय सराफा बाजारात गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती.गेल्या व्यापारिक आठवड्यात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १३७८ रुपयांनी वाढला होता, तर चांदीचा भाव प्रति किलो ३५३१ रुपयांनी वाढला होता. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला (३ ते ७ ऑक्टोबर) २४-कॅरेट सोन्याचा दर ५०३८७ होता, जो शुक्रवारपर्यंत ५१७६५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, ९९९ शुद्धतेच्या चांदीची किंमत ५७३१७  रुपयांवरून ६०८४८  रुपये प्रति किलो झाली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment