Benefits of Ginger : पावसाळा सुरू होताच रोगराई मोठ्या प्रमाणात वाढते. मुख्यत्वे शहरी भागात सर्दी, खोकला या समस्या प्रत्येकापुढं येतातच. त्वचेशी संबंधित समस्या असो किंवा डेंग्यू, मलेरिया आपण हे आजार आपल्यापैकीच कोणाला तरी झाल्याचं ऐकतो. त्यामुळं आल्याचं (Ginger) सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. हेल्थलाइनच्या मते, आलं अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे, ज्यामुळं शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक रोगांपासून संरक्षण देखील होतं. जाणून घेऊया पावसाळ्यात आल्याचं सेवन करणे किती फायदेशीर आहे आणि आपण त्याचा वापर कसा करू शकतो.
सर्दी खोकला आराम
पावसाळ्यात खोकला आणि सर्दी ही एक सामान्य गोष्ट आहे. अशा परिस्थितीत जेवणात आल्याचा जास्त वापर केल्यास किंवा रात्री झोपताना दुधात आलं मिसळून प्यायल्यास खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो. वाळलेले आलं कफ कमी करण्याचं काम करतं. याउलट ताजं आलं कफ वाढवण्याचं काम करतं. त्यामुळं, तज्ज्ञ मोसमी सर्दी-खोकला, सर्दी आणि फ्लूशी लढण्यासाठी कोरडं आलं खाण्याचा सल्ला देतात.
हेही वाचा – एकदा पिझ्झा खाल्ल्यानं आयुष्य ७.८ मिनिटांनी कमी होऊ शकतं..! वाचा कोणते पदार्थ आयुष्य वाढवतात
सांधेदुखी कमी
पावसाळ्यात अनेकदा सांधेदुखीची तक्रार असते. अशा परिस्थितीत पेन किलर घेण्याऐवजी आल्याच्या तेलानं मसाज केल्यास खूप फायदा होईल. जर तुम्ही जेवणात आल्याचं सेवन केलं तर त्यात असलेल्या दाहक-विरोधी गुणधर्मामुळे सूज इत्यादी वेदना कमी होतात.
केसांमधील कोंडा दूर
पावसाळ्यात केस वारंवार ओले राहिल्यानं कोंड्याची समस्या वाढते. या प्रकरणात, तुम्ही दोन चमचे किसलेलं आलं घ्या आणि त्यात तीन चमचे ऑलिव्ह तेल घाला. आता त्यात लिंबाचा रस घाला आणि केसांच्या टाळूला लावा. १५ मिनिटांनंतर केस सौम्य शाम्पूनं धुवा. असं आठवड्यातून दोनदा केलं तर कोंड्याची समस्या दूर होईल.
हेही वाचा – दोन लिंबू आणि कोळसा खाऊन ‘तो’ त्या बेटावर ५ दिवस जिवंत राहिला!
पुरळ निघून जाईल
पावसाळ्यात आर्द्रता वाढल्यानं त्वचेवर मुरुम वगैरे होतात. तर आल्यामधील अँटिसेप्टिक आणि क्लींजिंग एजंट मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. यासाठी चहा, डेकोक्शन किंवा भाजीमध्ये आल्याचा वापर करू शकता.
पचनास मदत करते
पावसाळ्यात अन्नातून विषबाधा होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. मेडिकल न्यूज बुलेटिननुसार, जर तुम्ही दररोज कच्चं आलं सेवन केलं तर ते तुमचं पचन सुधारेल. एवढंच नाही तर गॅस इत्यादी समस्याही दूर करू शकतात.
तोंडाच्या संसर्गास प्रतिबंध
आल्यामध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे तोंडाच्या संसर्गापासून बचाव करण्यास मदत करतात. हे हिरड्यांचं संक्रमण रोखण्यास देखील मदत करतं.