Flipkart च्या सेलमुळं लोक हैराण..! कंपनीवर काढतायत राग; म्हणाले, “हा तर स्कॅम आहे”

WhatsApp Group

Flipkart Big Billion Days Sale 2022 : या सणासुदीला फ्लिपकार्ट आणि त्यांच्या बिग बिलियन डेज सेल अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. सेलमध्ये घेतलेल्या वस्तूंचा घोटाळा लोकांनी सोशल मीडियावर आणला आहे. काहींनी वस्तू घेतल्या त्या आल्याच नाहीत, काहींना वस्तूच वेगळ्या मिळाल्या. स्पीकर ऐवजी तेल, फोन ऐवजी साबण, कोट ऐवजी होम वेअर अशा घटनांमुळे फ्लिपकार्ट चर्चेत आहे.

आठ दिवसांच्या सेलमध्ये फ्लिपकार्टने ५.५, बिलियन डॉलर्स म्हणजेच ४४ हजार कोटी रुपयांच्या वस्तू विकल्या आहेत. बिग बिलियन डे सेल संपल्यावर, फ्लिपकार्टने दसरा सेलचीही घोषणा केली आहे. मात्र या सगळ्यात ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्रासलेल्या ग्राहकांच्या ट्वीट्सने ट्विटर भरले आहे. फ्लिपकार्टने लोकांना काय त्रास दिला हे तुम्ही खालील ट्वीटच्या माध्यमातून पाहू शकता. लोकप्रिय ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टविरोधात लोकांचा रोष उसळला आहे. लोक कंपनीला खूप वाईट म्हणत आहेत. यासाठी ट्विटरवर हॅशटॅगही ट्रेंड करत आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारे कंपनीवर आरोप करत आहेत.

हेही वाचा – VIDEO : बांद्रा-वरळी सी लिंकवर भीषण अपघात..! ५ ठार; रुग्णवाहिका आणि ४ गाड्या धडकल्या!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment