बाप रे बाप..! हेअर ड्रायरमधून आग निघताच आख्खं सलून पेटलं; पाहा शॉकिंग VIDEO!

WhatsApp Group

Hair Dryer Blows Fire : हेअर ड्रायर सामान्यतः दररोज घरी आणि सलूनमध्ये वापरले जातात. केस सुकवण्यासाठी लोक याचा वापर करतात, मात्र या हेअर ड्रायरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून प्रत्येकानं काळजी घेणं आवश्यक आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक हेअर ड्रायर जीवघेणा ठरताना दिसत आहे आणि त्यामुळं एका सलून दुकानाला आग लागली आहे.

व्हिडिओमध्ये काय?

व्हिडीओमध्ये असं दिसून येतं की केस योग्य आकारात आणण्यासाठी सलूनमधील व्यक्ती ग्राहकावर हेअर ड्रायरचा वापर करतो, पण त्याचवेळी हेअर ड्रायरचा स्फोट होतो आणि त्यानंतर फक्त आग आणि धूर दिसतो. सलूनवाला हेअर ड्रायरला इलेक्ट्रिकल बोर्डशी जोडतो आणि तो सुरू करताच त्याचा स्फोट होतो. भीषण आगीमुळं काही सेकंदात सर्वकाही नष्ट होतं. स्फोटानंतर काही लोकांच्या ओरडण्याचा आवाज येत आहे.

हेही वाचा – VIDEO : चाहत्यानं केलं असं काही की हृतिक रोशन भडकला..! म्हणाला, “क्या कर रहा रहा है?”

लोकांची प्रतिक्रिया…

हा धक्कादायक व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक असं म्हणत आहेत की ते पुन्हा कधीही हेअर ड्रायर वापरणार नाहीत. हा भयानक व्हिडिओ कोणत्या शहराचा आहे आणि घटनेनंतर सलूनवाला आणि ग्राहकाची परिस्थिती कशी आहे? हे समजू शकलेलं नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक सोशल मीडियावर म्हणत आहेत की कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यापूर्वी, त्याचं वायरिंग तपासलं पाहिजे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओची सत्यता अजून पटलेली नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment