Meta Layoffs : ११,००० लोकांना नोकरीवरून काढलं..! फेसबुकच्या पॅरेंट कंपनीनं उचललं पाऊल

WhatsApp Group

Meta Layoffs : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकची मूळ कंपनी, मेटा प्लॅटफॉर्म इंकने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. नवीन भरतीवर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. मार्क झुकेरबर्गने कालच त्याच्या अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांना कामावरून कमी करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले होते. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग म्हणाले, “आम्ही इथे कसे पोहोचलो याची जबाबदारी मी घेतो. मला माहीत आहे की हे प्रत्येकासाठी कठीण आहे आणि मी प्रभावित झालेल्यांसाठी दिलगीर आहे.”

४ महिन्यांचा पगार मिळणार!

WSJ च्या अहवालानुसार मेटाच्या ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल त्यांना ४ महिन्यांचा पगार दिला जाईल. कंपनीच्या मानव संसाधन प्रमुख लॉरी गोलर यांच्या म्हणण्यानुसार, काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ४ महिन्यांचा पगार दिला जाईल. २००४ मध्ये सुरू झालेल्या कंपनीच्या १८ वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी टाळेबंदी आहे. कंपनीची खराब आर्थिक स्थिती आणि खराब तिमाही निकालामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा – Pak Vs Nz Semifinal : पाकिस्तानसाठी दोन ‘गूड’ न्यूज! फायनलही गाठली आणि…

टाळेबंदीची गरज का?

मेटाच्या पोर्टफोलिओमध्ये Facebook, Instagram आणि WhatsApp सारख्या प्रमुख उत्पादनांचा समावेश आहे. परंतु त्याच्या Metaverse व्यवसायावर अधिक गुंतवणूक केल्यामुळे, कंपनीची आर्थिक स्थिती बिघडली. खूप गुंतवणूक केली, पण परतावा मिळाला नाही, मग परिस्थिती बिकट होऊ लागली. अशा परिस्थितीत, मेटावरील तुमच्या एकूण व्यवसायात खर्चात कपात करण्याचा निर्णय घेणे हे एक जलद पाऊल आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment