Essential Medicines Price Hike : 1 एप्रिलपासून देशात महागाईचा आणखी एक झटका जनतेला बसणार आहे. लोकांना आता अनेक अत्यावश्यक औषधांसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. 1 एप्रिलपासून पेन किलरपासून अँटिबायोटिक्ससह अनेक अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. अत्यावश्यक औषधांच्या किमतीत 12 टक्के वाढ निश्चित करण्यात आली आहे.
पेन किलर, अँटी इन्फेक्शन आणि हृदयविकाराच्या औषधांपासून ते प्रतिजैविकांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढणार आहेत. सरकारने वार्षिक घाऊक किंमत निर्देशांक (WPI) मध्ये झालेल्या बदलांच्या अनुषंगाने औषध कंपन्यांना औषधांच्या किमती वाढवण्याची परवानगी दिली आहे. ज्या औषधांच्या किमती वाढतील त्यात पॅरासिटामॉलचा समावेश आहे, ज्याचा वापर सामान्य ताप आणि वेदनांसाठी केला जातो.
900 औषधांच्या किमतीत होऊ शकते वाढ
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, पेन किलर, अँटी-इन्फेक्टीव्ह, अँटीबायोटिक्स आणि हृदयाच्या औषधांसह सुमारे 900 औषधांच्या किंमती 12 टक्क्यांहून अधिक वाढू शकतात. हे सलग दुसरे वर्ष आहे की शेड्यूल्ड औषधांच्या किमतीत नॉन शेड्यूल्ड औषधांपेक्षा जास्त वाढ होणार आहे. शेड्यूल केलेली औषधे अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीचा भाग आहेत.
हेही वाचा – IPL 2023 : आयपीएलमध्ये नेट बॉलर्सना किती पैसे मिळतात? वाचून थक्क व्हाल!
किंमत वाढवण्यासाठी काय नियम आहेत?
लक्षणीय बाब म्हणजे, औषध किंमत नियामक राष्ट्रीय फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ला मागील कॅलेंडर वर्षाच्या वार्षिक घाऊक किंमत निर्देशांक (WPI) नुसार दरवर्षी 1 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी अनुसूचित औषधांच्या किमतीत सुधारणा किंवा वाढ करण्याची परवानगी आहे. शेड्युल्ड ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर 2013 च्या क्लॉज 16 मध्ये किंमत सुधारण्यासाठी आणि वाढवण्याचे नियम दिले आहेत. या नियमांतर्गत एनपीपीए दरवर्षी औषधांच्या किमती सुधारित करते आणि नवीन किमती 1 एप्रिलपासून लागू केल्या जातात.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!