Diwali 2022 : ऑक्टोबर महिना हा ग्रह परिवर्तन आणि सणा-सुदिनी गजबजलेला महिना आहे. नवरात्र, दसरा, करवा चौथ, धनत्रयोदशी तसेच दिवाळी या महिन्यातच आहे. या महिन्यात अनेक प्रमुख ग्रह राशी बदलणार आहेत, त्यामुळे अनेक ग्रह आपली हालचाल बदलतील. पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. यावर्षी हा दिव्यांचा उत्सव सोमवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२२ रोजी आहे. सुख-समृद्धीचे प्रतीक असलेल्या दिवाळीच्या या सणात माता लक्ष्मीसह गणेशाची पूजा केली जाते.
ग्रह बदल परिवर्तन
दिवाळीपूर्वी अनेक ग्रह राशी बदलत आहेत किंवा मार्गी लागले आहेत, तर दिवाळीनंतर एक ग्रह वक्री होणार आहे. याशिवाय यंदाचे शेवटचे सूर्यग्रहणही दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी होणार आहे.
दिवाळीला शुभ योग
ज्योतिष शास्त्रानुसार यावर्षी दिवाळी २४ ऑक्टोबर २०२२ रोजी आहे, त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी बुध ग्रह तूळ राशीत प्रवेश करेल. तूळ राशीत सूर्य, शुक्र आणि केतू आधीच बसलेले असतील. यामुळे तूळ राशीमध्ये एक अद्भुत योगायोग निर्माण होईल. दिवाळीपूर्वी १६ ऑक्टोबरला मंगळ मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर ३० ऑक्टोबरला मंगळ मिथुन राशीत वक्री होईल. २३ ऑक्टोबर रोजी शनी मकर राशीतून मार्गी होईल. यावेळी अशा शुभ ग्रह योगांसह दिवाळी अनेक राशींचे नशीब उघडू शकते.
हेही वाचा – ऑस्करसाठी पाठवण्यात आलेल्या भारतीय चित्रपटातील बालकलाकाराचं निधन!
दिवाळी शुभ मुहूर्त (दिवाळी मुहूर्त २०२२)
- कार्तिक अमावस्या तिथी प्रारंभ : २४ ऑक्टोबर ०६:0३ वाजता
- कार्तिक अमावस्या तिथी समाप्त : २४ ऑक्टोबर २०२२ ०२:४४ वाजता
- अमावस्या निशिता कालावधी : २३:३९ ते ००:३१, २४ ऑक्टोबर
- कार्तिक अमावस्या सिंह लग्न : ००:३९ ते ०२:५६, २४ ऑक्टोबर
- दिवाळी २०२२ : २४ ऑक्टोबर २०२२ रोजी
- अभिजीत मुहूर्त: २४ ऑक्टोबर सकाळी ११:१९ ते दुपारी १२:०५ पर्यंत
- विजय मुहूर्त : २४ ऑक्टोबर ०१:३६ ते ०२:२१ पर्यंत
दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची वेळ आणि मुहूर्त
- लक्ष्मी पूजन वेळ मुहूर्त : २४ ऑक्टोबर संध्याकाळी ०६:५३ ते ८:१६ पर्यंत
- पूजा कालावधी : १ तास २१ मिनिटे