Dabur To Acquire Stake In Badshah Masala : दैनंदिन वापरातील ग्राहक उत्पादने (FMCG) बनवणारी डाबर इंडिया ही कंपनी आता मसाले विकण्याच्या तयारीत आहे. सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यामुळे, कंपनीने बादशाह मसालामधील हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. डाबरने बादशाह मसालामधील ५१ टक्के हिस्सा ५८७.५२ कोटी रुपयांना विकत घेण्याची घोषणा केली आहे. डाबरने बादशाह मसाला प्रायव्हेट लिमिटेडमधील ५१ टक्के हिस्सा विकत घेण्यासाठी निश्चित करारावर स्वाक्षरी केली आहे, असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. या करारानंतर बादशाह मसाला डाबर इंडियाकडे असेल.
संयुक्त निवेदनानुसार, बादशाह मसाला तयार मसाले, मिश्रित मसाले आणि इतर खाद्य पदार्थांचे उत्पादन, विक्री आणि निर्यात करते. डाबर इंडियाने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की, हे संपादन कंपनीच्या अन्न क्षेत्रातील नवीन श्रेणींमध्ये प्रवेश करण्याच्या धोरणात्मक हेतूनुसार आहे. डाबर इंडियाने सांगितले की ५१ टक्के इक्विटी स्टेकसाठी ५८७.५२ कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे.
हेही वाचा – IND Vs NED : आज मॅच होणार नाही? टीम इंडियासाठी धोक्याची घंटा!
#JustIn | #Dabur to acquire 51% stake in Badshah Masala for ₹587.5 cr. The acquisition is expected to be completed before March 31, 2023 pic.twitter.com/Fh2SZdMTar
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) October 26, 2022
या डीलसाठी बादशाह मसाल्याची किंमत ११५२ कोटी रुपये होती. उर्वरित ४९ टक्के भागभांडवल पुढील पाच वर्षांनी विकत घेतले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने सांगितले की, या अधिग्रहणामुळे डाबर इंडियाचा फूड बिझनेस तीन वर्षांत ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा मानस आहे.