Covaxin घेणारे देखील असुरक्षित! 30% लोक ‘या’ आजारांनी ग्रस्त, रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा!

WhatsApp Group

Covaxin Side Effects : AstraZeneca-Oxford च्या कोविशिल्डच्या संभाव्य दुष्परिणामांच्या अहवालांदरम्यान, कोवॅक्सिनचे निर्माता, भारत बायोटेकने नुकतेच एक विधान जारी केले होते, की त्यांच्या लसीचा सुरक्षितता रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. कंपनीने सांगितले होते की त्यांच्या लसीमध्ये रक्ताच्या गुठळ्या, प्लेटलेटची कमतरता यासारखे कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत, परंतु बनारस हिंदू विद्यापीठातील संशोधकांनी दावा केला आहे की कोवॅक्सिन घेत असलेल्या 30 टक्के लोकांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.

बनारस हिंदू विद्यापीठातील संशोधकांनी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या दीर्घकालीन परिणामांची तपासणी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, Adverse events of special interest (AESI) परिणाम जवळजवळ एक तृतीयांश लोकांमध्ये दिसून आले आहेत. अभ्यास अहवालात असे म्हटले आहे की अभ्यासासाठी निवडलेल्या 926 सहभागींपैकी सुमारे एक तृतीयांश लोकांमध्ये वरच्या श्वसनमार्गामध्ये व्हायरल इन्फेक्शन ही सर्वात सामान्य तक्रार होती. याशिवाय रक्त गोठणे आणि ॲलर्जीचे परिणामही लोकांमध्ये दिसून आले आहेत.

स्ट्रोक आणि गुइलेन-बॅरे सिंड्रोम सारख्या गंभीर AESI देखील एक टक्के व्यक्तींमध्ये नोंदवले गेले आहेत, असे अहवालात म्हटले आहे. हा अभ्यास जानेवारी 2022 ते ऑगस्ट 2023 दरम्यान करण्यात आला. या अंतर्गत, 635 किशोर आणि 291 प्रौढांचा समावेश होता, ज्यांनी भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस घेतली होती. अभ्यासादरम्यान, किशोरवयीन मुलांमध्ये त्वचा आणि मज्जातंतू संबंधित अनेक विकार आणि रोग आढळून आले, तर प्रौढांमध्ये, मस्क्यूकोस्केलेटल विकार तसेच मज्जासंस्थेशी संबंधित इतर अनेक सामान्य विकार आढळले.

हेही वाचा – मद्यप्रेमींसाठी महत्वाची अपडेट, मुंबईत सलग 3 दिवस दारुची दुकाने बंद

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालात असे म्हटले आहे, की या अभ्यासात समाविष्ट महिलांवर देखील लसीचे प्रतिकूल परिणाम झाले. लस घेतल्यानंतर महिला आणि किशोरवयीन मुलींना टायफॉइडचा धोका वाढल्याचे अभ्यासात आढळून आले. कोविड महामारीच्या काळात भारतातील लोकांना फक्त कोविडशील्ड आणि कोवॅक्सिन लस दिली जात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कोवॅक्सिनचे दोन डोस देण्यात आले होते.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment