Diesel Filled In Petrol Car : पेट्रोल पंपावरील एक छोटीशी चूक तेल कंपनीला महागात पडली. कारमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल टाकण्यात आले, त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी जिल्हा ग्राहक न्यायालयाने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला 26 हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितले आहे. हे प्रकरण तेलंगणातील वारंगल येथील आहे. मीनाक्षी नायडू नावाच्या महिलेने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या ससी फ्युएल फिलिंग स्टेशन विरोधात ही तक्रार दाखल केली होती. 30 जुलै 2022 रोजी ही महिला पेट्रोल भरण्यासाठी गेली.
TOI च्या रिपोर्टनुसार, तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे की तिने पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या व्यक्तीला 1000 रुपयांचे पेट्रोल भरण्यास सांगितले आणि तिने डेबिट कार्डद्वारे पैसे दिले. महिलेचा आरोप आहे की, पेट्रोल भरल्यानंतर 10 मिनिटांनी तिची कार सुरू होत नव्हती. यावेळी इंजिनमधून मोठा आवाज येऊ लागला आणि गाडी नीट चालत नव्हती.
हेही वाचा – खेळ सुधारण्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली खेळणार देशांतर्गत स्पर्धा!
इंधन केंद्राविरुद्ध तक्रार
या महिलेने मोठ्या कष्टाने कार चालवत कसेतरी हैदराबाद गाठले. यानंतर 60 वर्षीय तक्रारदार महिलेने कार अधिकृत सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी पाठवली. तेथे तपासणी केल्यानंतर पेट्रोल कारमध्ये डिझेल टाकल्याने गाडीचे नुकसान झाले असून दुरुस्तीसाठी 6381 रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर महिलेने पेट्रोल पंपचालकाविरोधात तक्रार दाखल केली. इंधनाच्या टाकीवर पेट्रोलचे स्टिकर असूनही त्यात डिझेल टाकल्याचे महिलेने सांगितले. या प्रकरणात, इंधन केंद्राने महिलेच्या आरोपांना उत्तर देताना सांगितले की, जर तिच्यासोबत असे घडले असेल तर त्यांनी त्वरित तक्रार करायला हवी होती.
यानंतर हे प्रकरण जिल्हा ग्राहक न्यायालयात पोहोचले, जिथे सुनावणीनंतर न्यायालयाने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला तक्रारदाराला या निष्काळजीपणाबद्दल 26,000 रुपये भरपाई देण्यास सांगितले.
व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!