LPG Cylinder Price : आनंदाची बातमी..! एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त; ‘इतक्या’ रुपयांना मिळेल!

WhatsApp Group

LPG Cylinder Price : आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 92 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. मात्र, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतच हा बदल करण्यात आला आहे. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, सरकारने मार्चमध्ये व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती 350 रुपयांनी वाढवल्या होत्या आणि आता त्यातून 92 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये एलपीजीचे वजन 19 किलो असते.

या बदलानंतर देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक एलपीजी 2028 रुपये, कोलकात्यात 2132 रुपये, मुंबईत 1980 रुपये आणि चेन्नईमध्ये 2192.50 रुपये झाले आहे. त्याचबरोबर घरगुती गॅसच्या किमती मागील महिन्याप्रमाणेच राहिल्या आहेत. दिल्लीत 1103 रुपये, मुंबईत 1112.5 रुपये, कोलकात्यात 1129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1118.5 रुपये या दराने घरगुती गॅस विकला जात आहे. घरगुती गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतात. गेल्या महिन्यात घरगुती एलपीजीच्या दरातही 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

हेही वाचा – IPL 2023 CSK Vs GT : चेन्नईच्या ‘मराठी’ पोरांची झुंज अपयशी..! गुजरात टायटन्स ५ गड्यांनी विजयी

व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत 91.5 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. यावेळी केलेल्या कपातीची ही कमाल मर्यादा आहे. ही दरकपात दिल्ली आणि मुंबईत लागू आहे. त्याचबरोबर एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोलकात्यात 89.50 रुपयांनी आणि चेन्नईमध्ये 75.5 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

एलपीजीची किंमत कशी ठरवली जाते?

एलपीजीच्या किंमतीचा दर महिन्याला आढावा घेतला जातो. त्याच्या आढाव्यात काही गोष्टींची काळजी घेतली जाते आणि त्या आधारे गॅसच्या किमती वाढवल्या किंवा कमी केल्या जातात. स्वयंपाकाच्या गॅसची किंमत इंपोर्ट पॅरिटी प्राईस (IPP) च्या सूत्रानुसार ठरवली जाते. भारतात, स्वयंपाकाचा गॅस बहुतेक आयातीवर अवलंबून असतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय गॅसच्या किमतींचा मोठा परिणाम त्यात दिसून येतो. स्वयंपाकाच्या गॅसचा कच्चा माल कच्च्या तेलाचा आहे, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीवरही त्याचा मोठा परिणाम होतो. भारतातील बेंचमार्क LPG किंमत सौदी Aramco ची LPG किंमत आहे. एफओबी, मालवाहतूक, विमा, कस्टम ड्युटी आणि पोर्ट ड्युटी गॅसच्या किमतीमध्ये समाविष्ट आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment