

CNG PNG Price Hike : देशभरात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. गॅस सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेल महागल्यानंतर आता नवीन वर्षात CNG आणि PNG चे दर पुन्हा वाढले आहेत, म्हणजेच आजपासून तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. गुजरात गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. आता किती पैसे वाढले ते तपासूया.
किंमत किती वाढली?
सीएनजी आणि पीएनजीच्या किमती ५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. गुजरातच्या लोकांना आता गॅससाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. गुजरातमध्ये एक किलो सीएनजीसाठी ग्राहकांना ७८.५२ रुपये मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे, पीएनजीबद्दल बोलायचे तर, यासाठी ५०.४३ रुपये एससीएम (स्टँडर्ड क्यूबिक मीटर) खर्च करावे लागतील.
हेही वाचा – OYO Rooms : ओयोबाबत ‘मोठी’ बातमी..! सरकारी संस्थेनं उचललं ‘असं’ पाऊल
#AwaazBreakingNews
▶️#GUJGAS ने #CNG, #PNG के दाम बढ़ाए pic.twitter.com/6zejZrl70t— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) January 4, 2023
गॅस सिलिंडरही महागला
यासोबतच १ जानेवारीपासून गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १ जानेवारी २०२३ पासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. व्यावसायिक सिलिंडरच्या किमती २५ रुपयांनी वाढल्या आहेत. या वाढीनंतर दिल्लीत सिलेंडरची किंमत १७६९ रुपये, मुंबईत १७२१ रुपये, कोलकात्यात १८७० रुपये आणि चेन्नईमध्ये १९१७ रुपये झाली आहे.
घरगुती गॅसची किंमत किती?
याशिवाय घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आजही घरगुती गॅसचे दर स्थिर आहेत. सिलिंडरची किंमत दिल्लीत १०५३ रुपये, मुंबईत १०५२.५ रुपये, कोलकात्यात १०७९ रुपये आणि चेन्नईमध्ये १०६८.५ रुपये आहे.