Today’s Petrol Diesel Price in Marathi : देशभरात आज म्हणजेच बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते.
देशातील महानगरांमध्ये ही किंमत आहे
देशातील महानगरांमध्ये आज कोणताही बदल झालेला दिसत नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.
घरबसल्या किमती जाणून घ्या
एसएमएस करून तुम्ही घरी बसून पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊ शकता. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर RSP आणि तुमचा शहर कोड लिहा आणि 9224992249 या क्रमांकावर पाठवा, BPCL ग्राहकाने RSP आणि शहर कोड लिहून 9223112222 या क्रमांकावर पाठवा. यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे सर्व माहिती दिली जाईल. HPCL ग्राहकाला HPPprice आणि शहर कोड लिहून 9222201122 वर पाठवावा लागेल.
हेही वाचा – Cabinet Decision : धनगर समाजास नवी मुंबईला भूखंड, घाटकोपरला अण्णा भाऊ साठेंचे आंतरराष्ट्रीय स्मारक
दर रोज सकाळी ठरवले जातात
दररोज सकाळी इंधनाचे दर बदलतात. वास्तविक, परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किंमतीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात. तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारतात.
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!