Chanakya Niti : मौर्य काळातील महान राजकारणी आचार्य चाणक्य यांची धोरणे आपल्याला प्रत्येक पावलावर सावध आणि सतर्क राहायला शिकवतात. चाणक्याच्या विचारांचे पालन करणाऱ्यांची आयुष्यात फसवणूक क्वचितच होते. चाणक्याने अशाच काही लोकांचा उल्लेख केला आहे जे जगताना माणसाचे आयुष्य नरक बनवतात, हे असे लोक आहेत ज्यांच्याशी आपले खूप घट्ट नाते आहे आणि आपण या लोकांना रोज भेटतो. चाणक्य नीती असे सांगते की जर अशी माणसे तुमच्यासोबत जास्त काळ राहिली तर आयुष्य नरक बनून जाईल, त्यामुळे अशा लोकांपासून लवकरात लवकर दूर राहा.
दुष्टा भार्या शठं मित्रं भृत्यश्चोत्तरदायक:।
स-सर्पे च गृहे वासो मृत्युरेव न संशय:।।
दुष्ट पत्नी
पुरुषाची सर्वात महत्वाची सोबती म्हणजे त्याची पत्नी. चाणक्य म्हणतात, की दुष्ट स्वभावाची स्त्री, जिच्या बोलण्यात कटुता, खोटे बोलणे आणि फसवणूक आहे, अशा पत्नीसोबत राहणे म्हणजे नरकात राहण्यासारखे आहे. यामुळे पतीचे आयुष्य तर उद्ध्वस्त होतेच पण मुलांवर आणि कुटुंबावरही विपरीत परिणाम होतो. चाणक्यच्या मते, लग्नापूर्वी जर एखाद्या स्त्रीमध्ये असे गुण दिसले तर त्या व्यक्तीने तिला आपला जीवनसाथी बनवण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा.
फटकळ नोकर
चाणक्य म्हणतात, की तुमच्या घरातील नोकर फटकळ असेल, मालकाचा अनादर करत असेल तर त्याच्याशी संतुलित वागणूक ठेवा. अशा लोकांना घरात न ठेवणेच बरे, कारण अशा नोकरांचा सहवास मृत्यूला आमंत्रण देण्यासारखा आहे. ते कधीही तुमचा विश्वासघात करू शकतात आणि तुमचे नुकसान करू शकतात.
हेही वाचा – आता प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार..! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
स्वार्थी मित्र
मित्र हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आह. जे चेहऱ्यावर काही असतात आणि काही पाठीमागे असतात, असे लोक तुमच्या मैत्रीला कधीच पात्र ठरू शकत नाहीत. फसवणूक हा त्यांचा स्वभाव आहे, एक वेळ अशी येईल की ते तुमचीही फसवणूक करायला मागेपुढे पाहणार नाहीत.