Flipkart Sale : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये तुम्हाला अनेक वस्तूंवर आकर्षक सूट मिळत आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही सेलमध्ये उपलब्ध ऑफरचा लाभ घेऊ शकता. २५ नोव्हेंबरपासून सुरू झालेला फ्लिपकार्ट सेल ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
प्लॅटफॉर्मवर सुरू असलेल्या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनच्या खरेदीवर १२ टक्के सूट मिळेल. यासाठी ग्राहकांना आयसीआयसीआय बँक कार्ड, कोटक बँक किंवा सिटी बँक कार्ड वापरावे लागेल. याशिवाय, तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट ईएमआय आणि स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन ऑफरचाही लाभ घेऊ शकता. या सेलमध्ये तुम्हाला कोणत्या स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स मिळत आहेत, ते वाचा…
Apple iPhone 13
सेलमधील बहुतेक लोक आयफोनवर उपलब्ध असलेल्या डीलवर लक्ष ठेवतात. या फोनचा बेस व्हेरिएंट फ्लिपकार्टवर ६२,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर १७,५०० रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि बँक डिस्काउंट देखील आहे. यात ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल. हँडसेट A15 बायोनिक चिपसेटसह येतो. यात १२ MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि १२ MP फ्रंट कॅमेरा आहे.
हेही वाचा – Lumpy Skin Disease : नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्रातील पशुपालकांच्या खात्यांवर २५.३१ कोटी रुपये जमा
Nothing Phone 1
नथिंगने आपला पहिला आकर्षक फीचर्स असलेला स्मार्टफोन लॉन्च केला. हा फोन मिड रेंज बजेटमध्ये प्रीमियम फीचर्ससह येतो. हा हँडसेट तुम्ही Flipkart वरून रु.२७,४९९ मध्ये खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८ G+ प्रोसेसर, ६.५५ इंच फुल एचडी+ स्क्रीन आणि ४५०० mAh बॅटरीसह येतो. समोर १६ MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Google Pixel 7
गुगलने प्रदीर्घ काळानंतर भारतात आपली फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज लॉन्च केली आहे. हा फोन त्याच सीरीजचा भाग आहे, जो फ्लिपकार्टवर ५९,९९९ रुपयांना लिस्ट झाला आहे. तुम्ही हा फोन Rs.५१,४९९ मध्ये खरेदी करू शकता. हँडसेटमध्ये Tensor G2 प्रोसेसर, ४२७० mAh बॅटरी, ५० MP मुख्य आणि १२ MP दुय्यम कॅमेरा आहे.
Samsung Galaxy S22 Plus
सॅमसंगचा हा फोन फ्लॅगशिप सीरीजचा भाग आहे. यामध्ये तुम्हाला दमदार फीचर्स मिळतात. तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून ५५,४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 4500mAh बॅटरीसह येतो. यात ५० MP + १२ MP + १० MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.