Bharat Rice : फक्त 25 रुपये किलोने मिळणार तांदूळ, सरकारची मोठी घोषणा!

WhatsApp Group

वाढती महागाई लक्षात घेता केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने आता स्वस्त डाळ आणि मैदा नंतर भारत ब्रँड (Bharat Brand) अंतर्गत स्वस्त तांदूळ विकण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आटा आणि भारत डाळनंतर आता केंद्र सरकार भारत तांदूळ (Bharat Rice) विकणार आहे. लोकांना एक किलो तांदूळ अवघ्या 25 रुपयांत मिळणार आहे.

25 रुपये किलो तांदूळ

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, भारत सरकार नाफेड, एनसीसीएफ आणि केंद्रीय भंडारच्या माध्यमातून स्वस्त तांदूळ विकणार आहे. लोक 25 रुपये किलोने ‘भारत तांदूळ’ खरेदी करू शकतील. काही काळापासून तांदळाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. यंदा तांदळाच्या दरात 14.1 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सामान्य नॉन-ब्रँडेड तांदळाची किंमत सरासरी 43.3 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. अशा स्थितीत तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने भारत ब्रँड अंतर्गत स्वस्त तांदूळ विकण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – IPL 2024 : पंजाब किंग्ज नवीन स्टेडियमवर खेळणार सामने, जाणून घ्या मैदानाची खासियत

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने प्रथम भारत ब्रँड अंतर्गत स्वस्तात मैदा, डाळी, स्वस्त कांदा आणि टोमॅटोची विक्री केली आहे. 6 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने भारत आटा लाँच केला होता, ज्यामध्ये लोकांना 27.50 रुपये किलो दराने स्वस्त पीठ मिळू शकते. जिथे देशात पिठाची सरासरी किंमत 35 रुपये किलो आहे. तर 27.50 रुपयांना पीठ मिळत आहे. त्याचप्रमाणे सरकार 60 रुपये किलो दराने भारत डाळ विकत आहे. यापूर्वी कांदा आणि टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असताना सरकारने जनतेला बाजारापेक्षा कमी दरात कांदा आणि टोमॅटो उपलब्ध करून दिला. नोव्हेंबरमध्ये अन्नधान्य चलनवाढीचा दर 8.70 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर किरकोळ चलनवाढीचा दर 5.55 टक्क्यांवर पोहोचला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment