Basil Cultivation : भारतीय संस्कृतीत तुळशीला वेगळं महत्त्व आहे. बहुतेक घरांमध्ये तुळशीची रोपं लावली जातात. या वनस्पतींची पूजा केली जाते. तुळशीचा उपयोग औषध म्हणूनही केला जातो. अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी तुळशीचा उपयोग केला जातो. तुळशीचं रोप कोणत्याही प्रकारच्या सामान्य जमिनीत वाढू शकतं. असं असलं तरी भुसभुशीत किंवा चिकणमाती माती आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जागा त्याच्या लागवडीसाठी सर्वात योग्य आहे. क्षारयुक्त आणि कमी क्षारयुक्त जमिनीत तुळस चांगली वाढीस लागते.
तुळस किती वेळात तयार होते?
एक एकर जमिनीवर तुळशीची लागवड करायची असेल तर त्यासाठी ६०० ग्रॅम बियाणं आवश्यक आहे. तुळशीचं रोप वाढण्यास किमान १५ दिवस लागतात. तुळशीचं पीक ६० ते ९० दिवसांत पूर्णपणे तयार होते़ं. याचं उत्पादव विकून बाजारात चांगला नफा मिळवता येतो.
किंमत किती आहे?
तुळसीच्या लागवडीनंतरचं पहिलं पाणी लावणीनंतर लगेच द्यावं लागतं. त्यानंतर जमिनीतील आर्द्रतेनुसार पाणी द्यावं लागतं. कापणीसाठी उज्ज्वल उष्ण दिवस सर्वात योग्य आहे. एक बिघा जमिनीवर लागवड करण्यासाठी सुमारे १५०० रुपये खर्च येतो. तुळशीच्या पानांचा उपयोग अनेक प्रकारची औषधं बनवण्यासाठी केला जातो. अशा परिस्थितीत शेती करून शेतकऱ्याला खर्चापेक्षा कितीतरी पट अधिक नफा मिळू शकतो.
हेही वाचा – २०० कोटीच्या ‘मन्नत’ बंगल्याचा मालक आज सलमान खान असता, पण…
तुळशीचे फायदे
वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही तुळशीचं रोप खूप महत्वाचे मानलं जातं. तुळशीचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. त्याच्या फांद्या, पानं, बिया या सर्वांचं स्वतःचं महत्त्व आहे. तुळशीच्या रोपांच्या पूजेलाही पौराणिक महत्त्व आहे, त्यामुळं देशातील बहुतांश घरांच्या अंगणात त्याची रोपं नक्कीच दिसतात.
तुळशीच्या तेलाला चांगली मागणी
तुळशीची लागवड वालुकामय जमिनीत करता येते. हे करण्यापूर्वी शेतातील पाणी काढण्याची योग्य व्यवस्था असावी लागते. त्याची सर्वोत्तम प्रजाती ओसीमम बॅसिलिकम आहे. ही प्रजाती तेल उत्पादनासाठी घेतली जाते. त्यातील बहुतेक परफ्यूम आणि औषधांसाठी वापरला जातो. कॉस्मेटिक उद्योगात तुळशीच्या तेलाची मागणी मोठी आहे. जून-जुलैमध्ये पेरलेलं तुळशीचं पीक हिवाळा येताच चांगल्या स्थितीत पोहोचतं. प्रतिलीटर २००० रुपये हे तेल विकलं जातं.
हेही वाचा – स्वत:ला टोल टॅक्सचा ‘बाप’ म्हणत नितीन गडकरींनी दिली ‘ही’ खुशखबर!
तुळशीच्या लागवडीमुळं शेतकऱ्यांचे आरोग्य सुधारतं
पारंपारिक शेती सोडून ही औषधी शेती शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. चौपालच्या माध्यमातून वेळोवेळी औषधी शेतीची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे. अशा शेतकऱ्यांचा शासनाकडून वेळोवेळी सन्मानही करण्यात येतो. तुळशी ही एक औषधी वनस्पती आहे. ज्याच्या पानांमध्ये अत्यंत फायदेशीर गुणधर्म लपलेले असतात.