Ayushman Bharat Yojana : 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत उपचार! कधीपासून? जाणून घ्या

WhatsApp Group

Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत (AB-PMJAY), 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी पुढील आठवड्यात सुरू होऊ शकते. सरकारच्या या योजनेंतर्गत कोणत्याही उत्पन्न गटातील 70 वर्षांवरील भारतीय नागरिकांना मोफत उपचार घेता येणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार पीएम मोदी या प्रक्रियेला ग्रीन सिग्नल देऊ शकतात.

याशिवाय, सर्व गरोदर स्त्रिया आणि मुलांसाठी युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम (यूआयपी) अंतर्गत लसीकरण कार्यक्रमाला गती देण्यासाठी सरकारने तयार केलेले UWIN ॲपसह इतर मोठे आरोग्य प्रकल्प सुरू केले जाऊ शकतात. सरकारने आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना, उत्पन्नाची पर्वा न करता आरोग्य कवच देण्याची घोषणा केली होती.

या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आणि तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी देशाच्या अनेक भागांमध्ये पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना कौटुंबिक आधारावर वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचे कव्हरेज मिळेल. योजनेअंतर्गत, 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी उत्पन्नाचे कोणतेही निकष ठेवलेले नाहीत.

वृद्धांना 5 लाख रुपयांचे स्वतंत्र कव्हर

याच वर्षी एप्रिल महिन्यात पंतप्रधान मोदींनी याची घोषणा केली होती. नवीन पॉलिसीधारकांना सरकारकडून कार्ड जारी केले जातील. या योजनेंतर्गत अशी तरतूद आहे की 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्ध व्यक्तीचे कुटुंब आधीच आयुष्मान योजनेचा लाभ घेत असेल तर त्या वृद्ध व्यक्तीला 5 लाख रुपयांचे वेगळे कव्हर दिले जाईल.

या योजनेंतर्गत 70 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या सर्व वृद्धांवर मोफत उपचार केले जातील. त्यांना एक विशेष कार्ड घ्यावे लागेल, त्यासाठी त्यांना ॲपवर अर्ज करावा लागेल. त्यांचे वय सरकार आधार कार्डद्वारे तपासणार आहे. जर त्यांचे वय 70 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तर ते कितीही श्रीमंत किंवा गरीब असले तरीही त्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळेल. या योजनेअंतर्गत देशभरातील अनेक रुग्णालये जोडली गेली आहेत.

हेही वाचा – रतन टाटांचे मृत्यूपत्र : संपत्तीचा एक वाटा नोकर आणि श्वानासाठी; शंतनू नायडूचे कर्ज माफ

जर कुटुंबात पती-पत्नी दोघेही असतील आणि दोघांचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळेल. प्रथम, त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचारासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. उपचारासाठी 5 लाखांपेक्षा जास्त खर्च आला तरी सरकार आणखी 5 लाख रुपये देईल. या योजनेत प्रथमच नाव नोंदवणाऱ्या वृद्धांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. ही योजना 2018 पासून सुरू आहे.

सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये एक योजना सुरू आहे ज्या अंतर्गत गरीब लोकांना मोफत उपचार मिळतात. मात्र दिल्ली, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये ही योजना लागू झालेली नाही. ओडिशा सरकार आपल्या राज्यातही ही योजना सुरू करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करत आहे. योजनेअंतर्गत, 60% खर्च केंद्र सरकार आणि उर्वरित 40% राज्य सरकार उचलते. कोणत्याही राज्य सरकारला हवे असल्यास ते आपल्या हिश्श्यातील अधिक पैसे गुंतवून लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देऊ शकते.

वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment