16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी, ऑस्ट्रेलिया सरकारचा निर्णय

WhatsApp Group

Social Media : ऑस्ट्रेलियन सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून येत्या काही दिवसांत ते 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी गुरुवारी सांगितले की, सरकार 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यासाठी कायदा करणार आहे.

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान पत्रकार परिषदेत म्हणाले की, सोशल मीडियामुळे आमच्या मुलांचे नुकसान होत असून आता ते थांबवण्याची वेळ आली आहे. तसेच, त्यांच्या सरकारच्या मंत्र्यांनी या बंदीमध्ये कोणत्या प्लॅटफॉर्मचा समावेश केला जाईल हे सांगितले.

कायदा करण्यासाठी या वर्षी संसदेत एक विधेयक मांडण्यात येणार असून कायदा झाल्यानंतर 12 महिन्यांनंतर ही वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. तथापि, पॅरेंटल कंट्रोल देणाऱ्या व्यक्तीला कोणतीही सूट दिली जाणार नाही.

हेही वाचा – Video : इतिहासात पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या वाळवंटात पडला चक्क बर्फ!

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान म्हणाले, या कायद्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जबाबदारी घ्यावी लागेल की 16 वर्षाखालील मुले त्यांचा वापर करू शकत नाहीत. हा कायदा लागू झाल्यानंतर मेटा इंस्टाग्राम आणि फेसबुकसह, बाइटडान्सचे टिकटॉक आणि एलोन मस्क यांच्या एक्स प्लॅटफॉर्मचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय युट्युबचाही यात सहभाग असेल असे. मात्र, या चार कंपन्यांकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

जगातील अनेक देशांमध्ये सोशल मीडियाच्या नकारात्मक प्रभावापासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी अनेक कायदे आणि नियम आहेत. पण ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय या सर्वांपेक्षा खूपच कडक आहे.

गेल्या वर्षी, फ्रान्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रतिबंधित करण्याचा प्रस्ताव दिला होता. यूएसमध्ये 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा डेटा ऍक्सेस करण्यासाठी कंपन्यांना बऱ्याच काळापासून पालकांची संमती घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने या वयाखालील मुलांचा प्रवेश प्रतिबंधित केला आहे.

वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment