ATM मधून पैसे काढणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी..! ‘या’ सरकारी बँकेने नियमात केला बदल, जाणून घ्या!

WhatsApp Group

ATM Transaction : सरकारी बँकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. बँकेने एटीएम व्यवहाराशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. कॅनरा बँकेने ग्राहकांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. तुम्हीही एटीएम किंवा कार्डद्वारे पैशांचा व्यवहार करत असाल तर त्यापूर्वी तुम्हाला हे जाणून घ्या की कोणते नियम बदलले आहेत.

तात्काळ प्रभावाने नियम

कॅनरा बँकेने एटीएम कॅश, पीओसी तसेच ई-कॉमर्स व्यवहारांसाठी दैनंदिन व्यवहार मर्यादा वाढवली आहे. बँकेने आपल्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. बँकेने सांगितले की, नवीन नियम तात्काळ लागू झाले आहेत.

आता मर्यादा काय आहे?

रिझव्‍‌र्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्ड व्यवहारांची सुरक्षाही बँकेने वाढवली आहे. बँकेने क्लासिक डेबिट कार्डची एटीएम व्यवहार मर्यादा ४०,००० वरून ७५,००० प्रतिदिन केली आहे.

हेही वाचा – Mahaparinirvan Diwas 2022 : आजच्या तरुणाईसाठी बाबासाहेब आंबेडकरांचे हे १० विचार लक्षात ठेवण्यासारखे!

POS कॅप देखील वाढली 

याशिवाय, या कार्डांसाठी दैनंदिन PoC कॅप १ लाख रुपयांवरून २ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, जर तुम्ही क्लासिक डेबिट कार्डद्वारे NFC साठी दैनंदिन व्यवहार मर्यादा रु. २५,००० ठेवण्याचा निर्णय घेतला असेल. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मर्यादा २ वरून ५ लाखांपर्यंत वाढली

याशिवाय जर आपण प्लॅटिनम/बिझनेस/सिलेक्ट डेबिट कार्डबद्दल बोललो, तर रोख व्यवहार मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. ती ५० हजारांवरून १ लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर POS साठी दैनंदिन व्यवहाराची मर्यादा २ लाखांवरून ५ लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment