भारतात बनवलेलं सर्दी-खोकल्याचं सिरप प्यायलानं ६६ मुलांचा मृत्यू..!

WhatsApp Group

Cough Syrup News : पश्चिम आफ्रिकन देश गाम्बियामध्ये भारतीय औषध कंपनीने बनवलेले कंजेस्टंट आणि कफ सिरप प्यायल्याने ६६ मुलांचा मृत्यू झाला आहे. हा दावा करण्यासोबतच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या सिरपचा वापर न करण्याचा इशारा दिला आहे. दिल्लीतील सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

हे कफ सिरप हरयाणातील एका कंपनीत बनवले जातात. त्यांच्या सेवनाने गाम्बियामध्ये मोठ्या प्रमाणावर मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. WHO ने बुधवारी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की खोकल्याचे औषध डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोल हे मानवांसाठी विषासारखे आहेत. WHO चे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी सांगितले की, मुलांचा मृत्यू चार औषधांमुळे झाला आहे. या सिरपच्या सेवनाने त्यांची किडनी खराब झाली होती.

WHO या औषधांची फार्मास्युटिकल कंपनी आणि भारत सरकारच्या नियामक प्राधिकरणांसोबत चौकशी करत आहे. आतापर्यंत चार खोकल्याची औषधे मृत्यूचे कारण असल्याचे समोर आले आहे. यासाठी जगातील इतर देशांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ही द्वितीय श्रेणीची उत्पादने असुरक्षित आहेत आणि विशेषतः मुलांमध्ये धोकादायक शकतात.

हेही वाचा – Dasara Melava 2022 : “हो गद्दारी झाली, पण…”, एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना उत्तर!

WHO ने सर्व देशांना ही औषधे बाजारातून काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी स्वत: या देशांच्या आणि संबंधित प्रदेशाच्या पुरवठा साखळीवर लक्ष ठेवण्याचे सांगितले आहे. WHO च्या इशाऱ्यानंतर सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने तातडीने तपास करण्याचे आदेश जारी केले आहेत.

हे आहेत सिरपचे विषारी परिणाम आहेत

अशा कफ सिरपच्या विषारी परिणामांमध्ये पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या, जुलाब, लघवी करण्यात अडचण, मानसिक स्थितीत बदल आणि मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान यांचा समावेश होतो. यामुळे मृत्यू होऊ शकतो.

ही आहेत ती चार सिरप –

  • प्रोमेथाजिन ओरल सॉल्यूशन (Promethazine Oral Solution)
  • कोफेक्समालिन बेबी कफ सिरप (Kofexmalin Baby Cough Syrup)
  • मकॉफ बेबी कफ सिरप (Makoff Baby Cough Syrup)

  • मॅग्रीप एन कोल्ड सिरप (Magrip N Cold Syrup Maiden)

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment