डॉक्टरांनी ‘तिला’ सांगितलं फक्त चरबी जमा झालीय, पण निघाला ‘असा’ आजार! पाहा PHOTO

WhatsApp Group

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बैठी जीवनशैली, हार्मोन्स असंतुलन यामुळं लोकांना अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागत आहे. काही समस्या लवकर बऱ्या होतात पण काही समस्या अशा असतात, की त्या आयुष्यभर सुटत नाहीत. एका ३६ वर्षीय महिलेला असाच एक आजार झाला आहे, ज्यामुळे तिच्या खालच्या शरीराचा आकार इतका वाढला आहे की तिला चालताना खूप त्रास होतो. हा आजार जगभर पसरला आहे. जर तुम्हालाही या आजाराची लक्षणं दिसली तर तुम्ही ताबडतोब तज्ञांचा सल्ला घ्यावा. ही महिला कोण आहे? हा आजार काय आहे? त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यावर उपचार काय आहेत? याबद्दल जाणून घ्या.

कोण आहे ही महिला?

३६ वर्षीय थेरेसा फ्रेडेनबर्ग-हिंड्सचे लहानपणापासूनच पाय जाड झाले होते. एकदा डॉक्टरांना दाखवलं तेव्हा डॉक्टरांनी एवढंच सांगितलं होतं, की सर्व काही ठीक आहे, फक्त पायात चरबी जमा झाली आहे. डॉक्टरांचं म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तिनं या प्रकरणाकडं दुर्लक्ष केलं आणि कालांतरानं तिच्या पायाचा आकार आणखी वाढला.

दुकानदारानं ओळखला आजार!

थेरेसा स्टॉकिंग्ज (अर्धपारदर्शक नायलॉन किंवा रेशमाचे घट्ट मोजे जे मांडीपर्यंत येतात) घालायची जेणेकरून चालताना तिच्या खालच्या शरीरात चरबीच्या हालचालीमुळे तिचा तोल बिघडू नये. एकदा ती स्टॉकिंग्ज घेण्यासाठी एका दुकानात गेली तेव्हा दुकानदाराने तिचा आजार लगेच ओळखला. दुकानदारानं सांगितलं की तिला लिम्फोएडेमा किंवा लिपोएडेमा आहे. त्यानंतर जेव्हा थेरेसा डॉक्टरांकडं गेली तेव्हा रिपोर्टमध्ये लिपो-लिम्फोएडेमाची बाब समोर आली.
थेरेसानं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं, “मी लिम्फोएडेमाबद्दल ऐकलं होते आणि काही ऑनलाइन शोध देखील केले होते. लिम्फोएडेमा, जो हार्मोनच्या असंतुलनामुळं होतो असं मानलं जातं. चरबी जमा होण्यास सुरुवात होते. ही समस्या स्त्रियांमध्ये सामान्य आहे. त्याची लक्षणं प्रथम पायांमध्ये दिसतात, ज्यामुळे पायांचा आकार लक्षणीय वाढतो.”

हेही वाचा – सावधान..! हे १० पदार्थ रोज खाल्ले तर कोलेस्ट्रॉल वाढेलच आणि हार्ट अटॅकही येईल; वेळ काढून वाचा!

दुकानदारानं थेरेसाला आजाराबद्दल सांगितल्यावर तिनं डॉक्टरांशी संपर्क साधला. थेरेसा म्हणते, “मला सांगण्यात आलेृं की मी फक्त लठ्ठ आहे आणि माझ्या शरीराच्या खालच्या भागात चरबी जमा होण्याचं कारण आहे. पण माझ्या स्थितीचा माझ्या आयुष्यावर परिणाम होऊ लागला. मी जास्त वेळ उभी राहू शकत नाही. मी पायऱ्या चालू करू शकत नाही कारण माझं खालचं शरीर खूप जड होतं. खुर्च्यांवर हात ठेवून बसणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं कारण मी त्यात अडकायची. मला गाडीत बसून ट्रॅफिकमध्ये थांबताही येत नव्हतं. मी अद्याप शस्त्रक्रिया केलेली नाही.”

लिम्फोएडेमा आणि लिपोएडेमाचे कायमस्वरूपी उपचार अद्याप आलेले नाहीत. याचं कारण म्हणजे त्याची लक्षणं कमी करता येतात पण मुळापासून काढून टाकता येत नाहीत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment