100 Trillion Dollar Bank Note : महागाई आणि अन्न संकटामुळे अनेक देशांतील लोक त्रस्त आहेत. श्रीलंका, पाकिस्तान, तुर्कस्तान आणि अर्जेंटिना असे अनेक देश आहेत जिथे आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे. आफ्रिकन देश झिम्बाब्वेची अवस्थाही अशीच आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एकदा या देशात महागाई आणि आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी १०० ट्रिलियन डॉलर्सची नोट जारी करण्यात आली होती.
२००८ मध्ये, झिम्बाब्वेने १०० ट्रिलियन डॉलरची नोट काळ्या बाजारात आणली. या नोटेची किंमत भारतीय रुपयांमध्ये १०० लाख कोटी रुपये होती. आश्चर्याची बाब म्हणजे या नोटेचे मूल्य पाकिस्तानसह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. अशा स्थितीत आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या देशात एवढे प्रचंड चलन कसे जारी केले गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा – 7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची लॉटरी..! DA ‘इतका’ वाढणार; ३१ जानेवारीला…
Someone told me hyper-inflation is not thar bad for a country. I heavily disagree.
This is Zimbabwe's 100 Trillion dollar bank note. Worth about 40 US cents.
Hyper-inflation devastates countries and societies almost overnight.#inflation #economy #disaster pic.twitter.com/ueZ9Njjr2o
— MoonAndroid 🌕 (@TheMoonAndroid) October 19, 2022
महागाईशी स्पर्धा करण्यासाठी छापण्यात आली नोट
खरं तर, २००८ मध्ये आर्थिक संकटामुळे झिम्बाब्वेचा परकीय चलनाचा साठा संपुष्टात आला आणि त्याच्या चलनाचे मूल्य विक्रमी नीचांकी पातळीवर आले. त्यावेळी झिम्बाब्वेमध्ये महागाईचा दर प्रचंड वाढला होता. यामुळे झिम्बाब्वेच्या रिझर्व्ह बँकेला ट्रिलियन युनिट्सचे चलन आणण्याची गरज होती. २०२३ मध्ये पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जेव्हा झिम्बाब्वेला हे पाऊल उचलावे लागेल. त्यावेळी उच्च चलनवाढीचा सामना करणारी मध्यवर्ती बँक Z$१०tn, Z$२०tn आणि Z$५०tn नोटा आणण्याची योजना करत होती.
त्यावेळी झिम्बाब्वेमध्ये अन्न आणि इंधनाचा पुरवठा कमी असल्याने त्यांच्या किमती दररोज दुप्पट होत होत्या. मध्यवर्ती बँकेने प्रथम नोटा जारी करून चलनवाढीचा वेग राखण्याचा प्रयत्न केला, ज्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यावेळी झिम्बाब्वेमध्ये आर्थिक आणि राजकीय उलथापालथही तीव्र होती. आता पुन्हा एकदा झिम्बाब्वेमध्ये महागाई झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धानंतर या आफ्रिकन देशातील परिस्थिती बिघडू लागली आहे.