Yulu Wynn Electric Scooter : भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढत आहे. यावरून असे दिसून येते की आता ग्राहकांनी या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली आहे. तथापि, चांगल्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत अजूनही 1 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत आह. आज आम्ही तुम्हाला स्वस्त आणि आलिशान इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल सांगणार आहोत. विशेष बाब म्हणजे ही मेड इन इंडिया इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी बजाज ऑटोची उपकंपनी चेतक टेक्नॉलॉजीने तयार केली आहे.
या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव Yulu Wynn आहे. त्याची किंमत 55,555 रुपये आहे. कंपनी त्यावर 1 वर्षाची वॉरंटी देत आहे. ही एक सीटर इलेक्ट्रिक स्कूटर आहे आणि ती चालवण्यासाठी तुम्हाला परवान्याचीही गरज नाही. स्कूटर वापरण्यासाठी तुम्हाला चावीची गरज नाही. य़ाचे युलू नावाचे अॅप सर्व ऑपरेट करते. यात लोकेशन ट्रॅकिंगची सुविधाही आहे. जास्तीत जास्त 5 लोक या स्कूटरचे लोकेशन पाहू शकतात.
#overdrivenews Yulu launches Wynn electric scooter in India at Rs 55,000. pic.twitter.com/askfsRiQmu
— OVERDRIVE (@odmag) April 28, 2023
हेही वाचा – …तेव्हा हो म्हणाले असते, तर ओपेनहायमर भारताचे नागरिक असते!
Yulu has launched the Wynn, its first personal electric scooter, at Rs 55,555. Find out more: https://t.co/unPWx0Aaoe pic.twitter.com/5tgzDHG8mY
— BikeDekho (@bikedekho) May 2, 2023
Wynn च्या सीटची उंची 740 मिमी आहे आणि व्हीलबेस फक्त 1,200 मिमी आहे, आणि लोड क्षमता 100 किलो आहे. पूर्ण चार्ज झाल्यावर Wynn ची चार्जिंग रेंज 68 किमी (IDC) आहे. स्कूटरचा टॉप स्पीड 25KM पर्यंत आहे. रीअर व्ह्यू मिरर, सेंटर स्टँड, रिअर कॅरियर, मोबाईल धारक आणि हेल्मेट यासारख्या अनेक अॅक्सेसरीजसह विन खरेदी करता येते. ही स्कूटर लाल आणि पांढर्या रंगाच्या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!