

Loksabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर मोबाईल फोन वापरकर्त्यांना मोठा धक्का बसू शकतो. देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, निवडणुकीनंतर मोबाईल फोन वापरकर्त्यांचे बिल सुमारे 25% वाढू शकते. ET मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीत असे सांगण्यात आले की, टेलिकॉम कंपन्या अलीकडच्या काही वर्षात चौथ्या टप्प्यातील दरवाढीची तयारी करत आहेत. कंपन्यांच्या या पावलानंतर टेलिकॉम कंपन्यांचा महसूल वाढणार आहे.
ब्रोकरेज ॲक्सिस कॅपिटलच्या अहवालात म्हटले आहे की वाढती स्पर्धा आणि प्रचंड 5G गुंतवणुकीनंतर कंपन्यांना नफ्यात सुधारणा अपेक्षित आहे. सरकारच्या पाठिंब्यामुळे, येत्या काळात टेलिकॉम ऑपरेटरकडून 25% वाढ अपेक्षित आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की किंमत वाढ जरी जास्त वाटत असली तरी शहरे आणि खेडेगावात राहणाऱ्या लोकांसाठी हे सामान्य आहे. लोक जास्त इंटरनेट डेटा वापरत आहेत आणि खर्च कमी होण्याची शक्यता आहे.
शहरांमध्ये राहणारे लोक त्यांच्या एकूण खर्चापैकी 3.2% टेलिकॉमवर खर्च करायचे, हे वाढून 3.6% होईल. त्याच वेळी, खेड्यांमध्ये राहणाऱ्यांचा टेलिकॉमवरील खर्च 5.2% वरून 5.9% पर्यंत वाढेल. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की जर टेलिकॉम कंपन्यांनी बेसिक प्लॅनच्या किंमती 25% ने वाढवल्या तर त्यांचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) 16% वाढेल. याचा अर्थ प्रत्येक वापरकर्त्याकडून एअरटेलची कमाई 29 रुपयांनी वाढेल आणि प्रत्येक वापरकर्त्याकडून जिओची कमाई 26 रुपयांनी वाढेल.
हेही वाचा – IPL 2024 : इंग्लंडच्या 4 खेळाडूंचा आयपीएल संघांना अलविदा, अजून चौघे जाणार!
मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत जिओची प्रति ग्राहक सरासरी कमाई (ARPU) 181.7 रुपये होती. ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीसाठी भारती एअरटेलचा ARPU रुपये 208 होता आणि Vodafone Idea (Vi) 145 रुपये होता. टेलिकॉम कंपन्या 5G मध्ये झालेल्या खर्चाची भरपाई करण्यासाठी फोन रिचार्ज पॅकच्या किंमतीत बदल करतील. त्यांच्या मते, प्लॅनच्या किमतीत 10-15% वाढ केल्यास कंपन्यांचा ARPU सुमारे 100 रुपयांनी वाढू शकतो.
मोबाईल रिचार्ज पॅकच्या किमतीत वाढ झाल्याने भारती एअरटेल आणि जिओला सर्वाधिक फायदा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अहवालानुसार, मागील तीन दर वाढीनंतर दर 14-102% वाढले आहेत. दोन्ही दूरसंचार कंपन्यांनी सप्टेंबर 2019 आणि सप्टेंबर 2023 दरम्यान त्यांच्या ARPU मध्ये अनुक्रमे 58% आणि 33% वाढ केली आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा