More Price For Old Car : वाहन उत्पादक होंडा कार्स इंडियाने मारुती सुझुकी टोयोटा इंडिया (MSTI) सोबत वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी करार केला आहे. कंपनीने सोमवारी ही माहिती दिली. या कराराद्वारे, होंडा ग्राहकांना त्यांची जुनी वाहने (ELV) स्क्रॅप करण्यात बरीच सुविधा मिळणार असून जुन्या वाहनाच्या बदल्यात अधिक फायदे दिले जाणार आहेत. भारतातील वाहन स्क्रॅपेज धोरणाचे उद्दिष्ट जुनी आणि प्रदूषित वाहने रस्त्यावरून काढून टाकणे आणि अशा प्रकारे नवीन किंवा नूतनीकरण केलेल्या वाहनांची मागणी करण्यास प्रोत्साहन देणे हे आहे.
होंडा कार्स इंडियाने लिमिटेडने (HCIL) म्हटले, “या कराराअंतर्गत, कंपनी आपल्या ग्राहकांना त्यांच्या ELVs (वर्ष पूर्ण झालेली वाहने) वाजवी किंमत मिळवून देण्यास आणि डीलर्समार्फत नोंदणी रद्द करण्यात मदत करेल.” होंडा कार्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ताकुया त्सुमुरा म्हणाले, “कंपनी आपल्या ग्राहकांना त्यांच्या जुन्या गाड्या व्यवस्थित आणि पर्यावरणपूरक रीतीने स्क्रॅप करण्यासाठी डीलर्सद्वारे एक उपाय देईल.” MSTI ही सरकार मान्यताप्राप्त ELV स्क्रॅपिंग आणि रिसायकलिंग कंपनी आहे, जी देशभरात स्क्रॅप आणि रीसायकल केंद्रे तयार करते.
हेही वाचा – करोडोंचा मालक असलेला रोनाल्डो कोणता फोन वापरतो? व्हायरल होतोय ‘हा’ Photo!
या शहरांमध्ये प्रथम सेवा सुरू होईल…
माहिती देताना कंपनीने सांगितले की, ही सेवा प्रथम दिल्ली एनसीआर, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये सुरू होईल आणि नंतर ती देशातील इतर शहरांमध्ये विस्तारली जाईल. ताकुया सुमुरा म्हणाले की, या असोसिएशनसह, होंडा कार्स इंडिया आपल्या ग्राहकांना सेवा आणि आनंद देण्याच्या पलीकडे जाण्याचा मानस आहे.
ग्राहकांना काय फायदा होणार?
होंडाचे म्हणणे आहे, की भागीदारी अंतर्गत ग्राहकांना त्यांच्या जुन्या कारचे सर्वोत्तम मूल्य मिळेल. याशिवाय स्क्रॅप करावयाची गाडी ग्राहकाच्या घरातून उचलून स्क्रॅपिंग केंद्रात पोहोचवली जाईल. यानंतर, ग्राहकांना प्रमाणपत्र मिळेल, ज्याद्वारे ग्राहकांना देशाच्या वाहन स्क्रॅप धोरणांतर्गत उपलब्ध असलेले सर्व फायदे मिळतील. ग्राहकांसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकदा स्क्रॅप केल्यावर, जुन्या वाहनांचा नंतर गैरवापर होणार नाही, ज्यामुळे ते उद्भवू शकणार्या कोणत्याही कायदेशीर दायित्वापासून वाचतील.