World’s Most Expensive Feather : जगातील सर्वात महाग पंख एका पक्ष्याचे आहे जे दशकांपूर्वी नामशेष झाले होते. एका लिलावात, त्या पंखाला विक्रमी $28,400 (सुमारे 23,64,461 रुपये) मिळाले. लिलाव करणाऱ्या वेब्स ऑक्शन हाऊसच्या म्हणण्यानुसार, हुआया पक्षी (Huia Bird) 20 व्या शतकाच्या सुरुवातीला दिसला होता. वेब्स ऑक्शन हाऊसने अंदाज व्यक्त केला होता की या पंखाचा लिलाव सुमारे दीड लाख रुपयांना होईल. सोमवारी जगातील सर्वात महाग पंख म्हणून त्याचा लिलाव झाला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
न्यूझीलंडच्या संग्रहालयानुसार, हुआया पक्ष्याच्या पंखांचा वापर उच्च दर्जाच्या लोकांनी सजावटीसाठी केला होता. प्रमुख पदाच्या लोकांना त्यांच्या पोशाखात किंवा त्यांच्या शरीरावर हुआया पंख घालण्याची परवानगी होती. युरोपियन न्यूझीलंडचे लोक सुद्धा हुआया पंखांना आदराचे लक्षण मानत. फॅशन ॲक्सेसरीज म्हणून त्यांनी त्याची पिसे वापरली.
हुआया पक्षी
संग्रहालयानुसार, 19व्या शतकात माओरी आणि युरोपियन शिकारींनी हुआया पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली होती. त्यांची कातडी कलेक्टर आणि फॅशन ट्रेडर्सना विकली गेली. ड्यूक आणि डचेस ऑफ यॉर्क यांनी 1901 मध्ये न्यूझीलंडला भेट दिली तेव्हा त्यांच्या टोप्या हुआया पंखांनी सजल्या होत्या. यामुळे रातोरात हुआयाची लोकप्रियता वाढली आणि त्यांची मागणी लक्षणीय वाढली. सर्वांना हुआयाचे पंख हवे होते. त्यामुळे हा पक्षी धोक्यात आला होता. 20 व्या शतकाच्या सुरूवातीस, शास्त्रज्ञांनी उरलेल्या हुआया पक्ष्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु ते अयशस्वी झाले.
#VantageOnFirstpost: A rare and highly prized feather from the extinct New Zealand huia bird has sold for $28,365, making it by far the world’s most expensive feather ever sold at auction. @Palkisu tells you why this feather is so precious. pic.twitter.com/MaKK5XV4bv
— Firstpost (@firstpost) May 21, 2024
हेही वाचा – Gold Silver Price Today : सोने पहिल्यांदाच ₹74000 च्या पुढे, चांदी एक लाखाच्या जवळ!
Webb’s Auction House नुसार, सर्व संभाव्य खरेदीदारांना न्यूझीलंडच्या संस्कृती आणि वारसा मंत्रालयाकडून परमिट घेणे आवश्यक होते. ही राष्ट्रीय महत्त्वाची वस्तू असल्याने, केवळ नोंदणीकृत संग्राहक हे पंख विकत घेऊ शकतात. मंत्रालयाच्या परवानगीशिवाय पंख देशाबाहेर नेले जाऊ शकत नाहीत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा