‘हे’ आहेत जगातील सर्वात महागडे इयरफोन! किंमत ऐकाल तर….

WhatsApp Group

लुई व्हिटॉन (Louis Vuitton) हा ब्रँड त्याच्या विलक्षण डिझाईन्स आणि महाग उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. हा एक फ्रेंच लक्झरी ब्रँड आहे, जो बॅग्ज, बेल्ट आणि कपड्यांसाठी लोकप्रिय आहे. पण, या लक्झरी कंपनीने आता गॅजेट्सच्या जगातही प्रवेश केला आहे. Louis Vuitton च्या वायरलेस इयरफोन्सने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. कारण त्याची किंमत आहे. याला जगातील सर्वात महागडे इयरफोन (World’s Most Expensive Earphones In Marathi) देखील म्हटले जात आहे. त्यांची किंमत टाटा नॅनो कारपेक्षा जास्त आहे.

याचे नाव Louis Vuitton Horizon Light Up Earphones असून हे इयरफोन यावर्षी मार्चमध्ये रिलीज करण्यात आले होते. इंटरनेट यूजर या गॅझेटबद्दल धक्कादायक आहेत. कारण, या इयरफोनची किंमत $1,66o म्हणजेच अंदाजे 1,38,204 रुपये आहे. या किमतीत एक सुपर प्रीमियम आयफोन येईल. टाटाच्या नॅनो कारचीही किंमत एक लाख रुपये असायची.

हेही वाचा – VIDEO : कुस्तीपटू बजरंग पुनियाने परत केला पद्मश्री पुरस्कार

हे इअरबड्स हलक्या वजनाच्या अॅल्युमिनियम फ्रेमवर बनवण्यात आले आहेत. याशिवाय पॉलिश नीलमणीचा थरही येथे दिला आहे. यात एक्टिव नॉइस कॅन्सिलेशन आणि बॅकग्राउंड नॉइस-एलिमिनेटिंग मायक्रोफोन्स देण्यात आले आहे. यामध्ये युजर्स एकाच वेळी दोन वेगवेगळ्या सोर्सेजमधून ऑडिओ स्ट्रीम करू शकतात. हा इयरफोन 5 रंगात उपलब्ध आहेत. या गॅझेटची बॅटरी लाइफ 28 तास आहे. ही बॅटरी स्टेनलेस स्टील कॅरी केससह उपलब्ध असेल. जी पॉवर बँक म्हणून उपयुक्त ठरेल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment