भारीय हे..! शास्त्रज्ञांनी आणला जगातील हलका पेंट; एका डब्यात फ्लॅट रंगेल!

WhatsApp Group

World’s Lightest Paint : अगदी छोटंसं घर रंगवण्यासाठी अनेक लिटर रंग लागतो आणि त्याची किंमत खूप जास्त असते. पण, शास्त्रज्ञांनी अतिशय हलका रंग तयार केला आहे. बोईंग 747 विमान रंगविण्यासाठी सुमारे 454 किलो पेंट लागत असला तरी संपूर्ण विमान केवळ 1.36 किलो पेंटने रंगविले जाऊ शकते. ते अनेक शतके टिकेल आणि ऊर्जा वाचवण्यासही उपयुक्त ठरेल, असा हा रंग बनवणाऱ्या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे.

फुलपाखरांनी प्रेरित

शास्त्रज्ञांनी सांगितले की त्यांनी फुलपाखराच्या पंखांच्या रंगांनी प्रेरित होऊन हे पेंट तयार केले असून या विशेष पेंटमध्ये रंगद्रव्यांचा वापर करण्यात आला आहे. ज्या शास्त्रज्ञांनी ते तयार केले त्यांनी त्याला प्लाझमोनिक पेंट असे नाव दिले आहे. कारण, हा रंग केवळ प्रयोगशाळेतच तयार करण्यात आला असून तो मोठ्या प्रमाणावर तयार होण्यास वेळ लागू शकतो.

या पेंटचे तापमान सामान्य पेंटपेक्षा कमी

हे पेंट सर्व प्रकारचे इन्फ्रारेड स्पेक्ट्रम प्रतिबिंबित करते. यातून कमी हरितगृह वायू उत्सर्जित होतील. हे सामान्य पेंटपेक्षा 13 ते 16 अंश सेल्सिअस थंड राहते. शास्त्रज्ञांनी ते अनेक रंगात तयार केले आहे. आता ते त्याच्या उत्पादन तंत्रज्ञानावर अधिक भर देत आहेत.

हेही वाचा – असली कसली शाळा..! पोरांना प्रेम करायला सांगितलं, दिली 7 दिवसांची सुट्टी!

सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठातील नॅनोसायंटिस्ट देबाशीष चंदा यांनी हे पेंट बनवले आहे. ते म्हणतात की अमेरिकेच्या एकूण विजेच्या वापरापैकी 10 टक्के वातानुकुलीत खर्च होतो. या पेंटने इलेक्ट्रॉनिक उपकरणे रंगवली तर मोठ्या प्रमाणात ऊर्जा वाचू शकते.

पेंटची जाडी फक्त 150 नॅनोमीटर

सध्या, व्यावसायिक रंगात वापरले जाणारे रंगद्रव्य कृत्रिमरित्या संश्लेषित करून तयार केले जाते. परंतु या पेंटमध्ये रंगद्रव्याच्या प्रत्येक कणामध्ये इलेक्ट्रॉनिक गुणधर्म असतात. त्‍यामुळे ते किती उष्णता आणि प्रकाश शोषून घेईल हे ठरते. या कणांमुळे, प्लाझमोनिक पेंटचे वजन जास्त हलके असते. त्याची जाडी फक्त 150 नॅनोमीटर आहे आणि या जाडीमध्ये फक्त हा पेंट पूर्ण रंग देतो. त्यामुळे हा जगातील सर्वात हलका पेंट आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment