जगातील सर्वात उंच स्मशानभूमी, 40 लाख खर्च करून लोक जातात!

WhatsApp Group

आजच्या काळात लोकांना चॅलेंजेस घेणं आवडतं आणि या चॅलेंजेसमध्ये मृत्यूचा धोका असेल तर लोकांची आवड अजून वाढते. पर्वत चढण्याची आवड असलेले लोक माउंट एव्हरेस्ट (Mount Everest In Marathi) जिंकण्याचे स्वप्न पाहतात. पण हे काही सोपे काम नाही. एव्हरेस्ट चढणे हे जगातील सर्वात कठीण कामांपैकी एक आहे. ते करत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात आणि या सर्वांचा सामना करून जो पुढे जातो तो एव्हरेस्टवर विजय मिळवतो.

माऊंट एव्हरेस्टवर चढाई हा व्यवसाय कसा झाला, हे तुम्हाला माहितीच असेल. त्यावर चढायचे असेल तर सुमारे 40 लाख रुपये खर्च करावे लागतात. यात परवान्यापासून ते गिर्यारोहण करणार्‍या शेर्पांच्या फीपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. नेपाळ सरकारकडून परमिट मिळवण्याव्यतिरिक्त, शेर्पांची फी 6 ते 9 लाख रुपयांपर्यंत आहे. याशिवाय तुमच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी 4 लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. दरवर्षी एव्हरेस्टच्या चढाईतून सुमारे 380 कोटींचा व्यवसाय होतो. केवळ हिमालयावर चढणेच नव्हे, तर इतर अनेक शिखरांवर चढाई करणे हा आजकाल अतिशय फायदेशीर व्यवसाय बनला आहे. पैसे खर्च करून लोक या साहसाचा आनंद घेतात. पण आज आम्‍ही तुम्‍हाला माऊंट एव्‍हरेस्टविषयी एक अशी गोष्ट सांगणार आहोत, जी थोडी भीतीदायकही आहे. एव्‍हरेस्ट हे जगातील सर्वात उंच स्मशानभूमी म्हणूनही ओळखले जाते.

अनेक मृतदेह पुरलेले आढळतात

एव्हरेस्टवर चढाई करताना हवामानातील बदल, थंडी, ऑक्सिजनची कमतरता इत्यादींचा सामना करावा लागतो. जर तुमची मानसिक स्थिती मजबूत नसेल तर तुम्ही सहज धैर्य गमावू शकता. असे अनेक गिर्यारोहक आहेत जे गिर्यारोहण पूर्ण करू शकत नाहीत आणि वाटेतच आपला जीव गमावतात. त्यामुळे तुम्ही एव्हरेस्टच्या वाटेवर निघाला असाल, तर अशा गिर्यारोहकांचे मृतदेह तुम्हाला वाटेत सापडतील. कधी कधी हे मृतदेह शेकडो वर्षे जुने निघतात.

हेही वाचा – फुकटात पाणी विकून बक्कळ नफा कमावतेय कंपनी, जगात होतेय चर्चा!

वास्तविक, एव्हरेस्टवरून मृतदेह खाली आणणेही खूप आव्हानात्मक आहे. अशा परिस्थितीत मोजकेच लोक आपल्या प्रियजनांना परत आणतात. असे बरेच लोक आहेत जे आपल्या जवळच्यांचे मृतदेह बर्फात सोडतात. जेव्हा इतर ग्रुप वर जातात, तेव्हा ते या मृतदेहांमधून जातात. बर्फाच्छादित भागात तापमान खूपच कमी असते. त्यामुळे मृतदेह कुजत नाहीत. पण हे दृश्य खूपच भीतीदायक असते.

वातावरणाच्या धोक्यामुळे उंच ठिकाणांहून मृतदेह बाहेर काढणे महाग आणि कठीण आहे. काठमांडू पोस्ट वृत्तपत्रातील एका अहवालानुसार, एखाद्या मृतदेहाला अत्यंत टोकापासून खाली आणण्यासाठी 20,000 अमेरिकन डॉलर ते 2,00,000 अमेरिकन डॉलर खर्च येऊ शकतो. एव्हरेस्ट आणि इतर शिखरांवर चढाई करण्यासाठी परदेशी एजन्सी त्यांच्या ग्राहकांकडून किती शुल्क आकारतात याची सध्या कोणतीही नोंद नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment