Sodium-Ion Battery Electric Car : इलेक्ट्रिक कारची मागणी झपाट्याने वाढत आहे, मात्र तिची किंमत जास्त असल्याने ग्राहक अजूनही त्या खरेदी करणे टाळत आहेत. इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीमध्ये सर्वात मोठा खर्च त्याच्या बॅटरीवर होतो. सध्या, लिथियम-आयन बॅटरी वाहनांमध्ये वापरली जातात, परंतु लवकरच हे बदलणार आहे. चीनची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी JAC ने कमी किमतीच्या सोडियम-आयन बॅटरीवर चालणारी जगातील पहिले इलेक्ट्रिक गाडी आणली आहे. या बॅटरीचा वापर करून भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांची किंमत १० टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकते.
सोडियम-आयन बॅटरी स्वस्त कच्चा माल वापरतात आणि मुख्य घटक म्हणून लिथियम आणि कोबाल्टवर अवलंबून असलेल्या विद्यमान तंत्रज्ञानासाठी ईव्ही उत्पादकांना पर्याय देऊ शकतात. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, सोडियम-आयन बॅटरी बीजिंग-आधारित स्टार्टअप हिना बॅटरी टेक्नॉलॉजीजने विकसित केली आहे.
हिनाने एका निवेदनात सांगितले की, JAC EV मध्ये २५ किलोवॅट तास (kWh) बॅटरी आहे, जी एका चार्जवर २५० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. “गेल्या वर्षी लिथियम कार्बोनेटच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे अनेक बॅटरी निर्माते आणि ग्राहकांना वाढत्या खर्चाच्या दबावाला सामोरे जावे लागले,” असे कंपनीने म्हटले आहे. म्हणून सोडियम-आयन बॅटर्या लिथियम-आयन बॅटर्यांसाठी सर्वोत्तम पर्याय आहेत, ज्यात चांगली किंमत, परफॉर्मन्स, चांगली सुरक्षा तसेच उत्कृष्ट सायकल कार्यप्रदर्शन आहे.”
E10X es el automóvil eléctrico que te hará sentir la emoción de la velocidad ⚡🔋
🖥️ Cotiza, aparta y compra tu JAC en https://t.co/giOQ5S9R4r
☎️ 8110012000
📲 8117594686#JAC #JACMonterrey #E10X pic.twitter.com/RoDf1AG0WC— @JacStoreMonterrey (@JacStoreMonter1) February 26, 2023
हेही वाचा – जास्त दिवस जगायचंय? मग ‘या’ सुपरफूड्सचा आहारात करा समावेश
सोडियम-आयन बॅटरीची घनता त्यांच्या लिथियम-आयन समकक्षांपेक्षा कमी असते. या बॅटरीचे कमी-तापमान कार्यप्रदर्शन आणि चार्जिंग गती यासारखे फायदे आहेत. दरम्यान, चीनची इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी BYD परदेशात कामाचा विस्तार करत आहे.
Nikkei Asia मधील अहवालानुसार, BYD, जे ४० पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे, जपान आणि आग्नेय आशिया आणि युरोपमधील देशांसह यावर्षी सुमारे २० लाख इलेक्ट्रिक गाड्या विकण्याची योजना आखत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, BYD ऑटोने जागतिक बाजारपेठेत आघाडीवर राहून ५,३७,००० EV युनिट्सची शिपिंग सुरू ठेवली, जी १९७ टक्क्यांनी वाढली.