भारतात धावते जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन! सर्व रोगांवर होतो इलाज

WhatsApp Group

Worlds First Hospital Train : भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे नेटवर्क आहे, ज्याद्वारे 40 मिलियन लोक दररोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. लोकांना रोजगार देण्याच्या बाबतीत भारतीय रेल्वे जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय रेल्वेशी निगडित अशा अनेक रंजक गोष्टी आहेत, ज्याबद्दल जाणून घेतल्यास तुम्हाला अभिमान वाटेल. तुम्हाला कदाचित माहिती नसेल की भारतीय रेल्वे केवळ प्रवासी आणि मालगाड्याच वाहतूक करत नाही तर जगातील सर्वात मोठे मोबाईल हॉस्पिटल देखील चालवते.

भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पेशल ट्रेनचे (Worlds First Hospital Train), ज्याला मोबाईल हॉस्पिटल म्हटले जाते, त्याचे नाव ‘लाइफलाइन एक्सप्रेस’ आहे. रेल्वेने जुलै 1991मध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ही ट्रेन सुरू केली. सुरुवातीला या ट्रेनचे नाव जीवन रेखा एक्स्प्रेस होते, जी नंतर लाइफलाइन एक्सप्रेस झाली. ही ट्रेन देशातील दूरवरच्या भागात जिथे मोठे हॉस्पिटल नाही किंवा डॉक्टर-आरोग्य सुविधांचा अभाव आहे अशा लोकांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

या ट्रेनमध्ये सर्व सुविधा आहेत ज्या सामान्य हॉस्पिटलमध्ये असायला हव्यात. या संपूर्ण ट्रेनची रचना फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यात ऑपरेशन थिएटर, तपासणीसाठी आधुनिक मशीन, रुग्णांसाठी बेड आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर-पॅरा मेडिकल स्टाफ आहे. ट्रेनच्या प्रत्येक डब्यात मेडिकल वॉर्ड, पॉवर जनरेटर, ऑक्सिजन आणि वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या आहेत. यासोबतच या मेडिकल ट्रेनमध्ये पॅन्ट्री कारची सुविधाही जोडण्यात आली आहे.

हेही वाचा – Gold Silver Price Today : सोने खरेदी करण्याची चांगली संधी! वाचा आजचा रेट

आतापर्यंत 12 लाख लोकांवर उपचार

भारतीय रेल्वेच्या अहवालानुसार, या मार्गावरील हॉस्पिटल ट्रेनच्या मदतीने आतापर्यंत सुमारे 12 लाख लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. ही जगातील पहिली आणि एकमेव अशी हॉस्पिटल ट्रेन आहे, जी देशातील दुर्गम भागात जाऊन गरजू रुग्णांवर मोफत उपचार करते. सध्या ही ट्रेन आसाममधील बदरपूर स्टेशनवर उभी आहे आणि तिथल्या लोकांवर उपचार करत आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या ट्रेनमध्ये 2 आधुनिक ऑपरेशन थिएटर, 5 ऑपरेटिंग टेबल आहेत. ट्रेनचा प्रत्येक डबा वातानुकूलित आहे. नसबंदी कार्यक्रमाला चालना देण्यासाठी ट्रेनमध्ये एक विशेष कोच देखील आहे, जिथे शस्त्रक्रियेनंतर पुरुष आणि महिलांना प्रवेश दिला जातो. गेल्या 32 वर्षांपासून धावणारी ही ट्रेन देशाचा प्रत्येक भाग व्यापते आणि नियमितपणे मागासलेल्या भागात जाते.

या ट्रेनमध्ये एकूण 7 डबे आहेत. तिच्या वेळापत्रकानुसार ही ट्रेन वेगवेगळ्या राज्यात जाते आणि तिथल्या स्थानकांवर थांबते. त्यानंतर तिथले लोक उपचारासाठी चालत हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. भारतीय रेल्वे इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने ही ट्रेन चालवते. या ट्रेनमध्ये नियमित तपासणी व्यतिरिक्त गंभीर रुग्णांवर शस्त्रक्रिया आणि इतर उपचार केले जातात.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment