World’s First 6G Device : बऱ्याच लोकांनी 5G स्पीडचा अनुभव घेतला आहे, 5G स्पीड मध्ये वापरकर्त्यांना हाय स्पीड इंटरनेट मिळते. आता जगातील पहिल्या 6G डिव्हाइसचा प्रोटोटाइप समोर आला आहे. हे 100 गीगाबिट्स (जीबी) प्रति सेकंद वेगाने डेटा पाठवू शकते.
हे 300 फुटांपेक्षा जास्त क्षेत्र व्यापू शकते. सध्याच्या 5G तंत्रज्ञानापेक्षा ते 20 पट वेगवान आहे. हे बऱ्याच लोकांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. पण हे डिव्हाइस स्मार्टफोन नाही.
जपानी कंपन्या भागीदारीत स्थापन
हे 6G डिव्हाइस जपानने तयार केले आहे. हे डिव्हाइस काही कंपन्यांनी भागीदारी अंतर्गत बनवले आहे. यामध्ये डोकोमो, एनटीटी कॉर्पोरेशन, एनईसी कॉर्पोरेशन आणि फुजीत्सू यांच्या नावांचा समावेश आहे.
हेही वाचा – Air India ची तब्बल 86 उड्डाणे रद्द, वरिष्ठ क्रू मेंबर्स न कळवता रजेवर!
11 एप्रिल रोजी यशस्वी चाचणी
11 एप्रिल रोजी या डिव्हाइसची यशस्वी चाचणी पूर्ण झाल्याचे अहवालात म्हटले आहे. कंपन्यांनी उघड केले की हे प्रोटोटाइप डिव्हाइस 100Gbps च्या स्पीडपर्यंत पोहोचू शकते. डिव्हाइसला 328 फूट अंतरावर ठेवून ही चाचणी करण्यात आली आणि वेगही तपासण्यात आला.
सध्या एकाच डिव्हाइसवर 6G चाचणी
6G ची चाचणी एकाच डिव्हाइसवर करण्यात आली आहे. त्याची व्यावसायिक चाचणी अद्याप झालेली नाही. सैद्धांतिकदृष्ट्या 5G वर 10Gbps चा कमाल वेग मिळू शकतो. मात्र, वास्तविक जगात हा वेग कमीच राहतो. अमेरिकेतील टी-मोबाइल वापरकर्त्यांना सरासरी 200 मेगाबिट्स प्रति सेकंद (Mbps) गती मिळते.
6G तंत्रज्ञानाबाबत अजून बरेच काम करायचे आहे. भारतातही याबाबत काम सुरू झाले आहे. वापरकर्त्यांना 6G वर अतिशय वेगवान इंटरनेट स्पीड मिळेल. त्याच्या मदतीने, तुम्हाला चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल आणि डिव्हाइसवरला अधिक अचूकता देखील मिळेल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा