VIDEO : जेव्हा जगातील श्रीमंत माणूस घाण वास येणाऱ्या गटारात उतरतो…

WhatsApp Group

जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हटलं की सर्वांच्या मनात एक नाव येतं ते म्हणजे बिल गेट्स. अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती असलेले बिल गेट्स यांनी एका कृतीने सर्वांना थक्क केले. गेट्स चक्क गटारात (Bill Gates walks Into Sewer) उतरले. याचा व्हिडिओही त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

ब्रुसेल्सच्या सीवर सिस्टमबद्दल माहिती गोळा करण्यासाठी गेट्स यांचा आग्रह होता. ही गटारे आणि ट्रीटमेंट प्लांट्सचे 200 मैलांचे नेटवर्क शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करते. जागतिक शौचालय दिनानिमित्त बिल गेट्स गटारात उतरले. 1800 च्या दशकात शहरातील सेने नदीत सांडपाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे कॉलराची भीषण साथ पसरली. आज, गटारे आणि ट्रीटमेंट प्लांट्सचे 200 मैलांचे नेटवर्क शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करते.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती अपडेट! जाणून घ्या दिल्ली मुंबईत तेलाचे दर काय

गेट्स अनेकदा स्वच्छतेशी संबंधित समस्यांबाबत जनजागृती करण्याचे काम करताना दिसतात. 2015 मध्ये त्यांनी शौचालयाचे पाणी पिण्यायोग्य बनवण्याचा मार्ग जाणून घेतला. ते त्यांच्या माजी पत्नीच्या ‘बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन’च्या माध्यमातून जागतिक समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment