कोणी बघा किंवा नका बघू…पण घरात टीव्ही लागतोच. आजकाल राजकारणाची आवड असणाऱ्यांसाठी टीव्ही गरजेचा आहेच. तुम्ही कुठेही बसून टीव्हीच्या माध्यमातून कोणत्याही क्षेत्राशी संबंधित माहिती सहज मिळवू शकता. आज अर्थातच, ओटीटी प्लॅटफॉर्म सारखी संसाधने उपलब्ध आहेत, परंतु लोकांचे टीव्हीवरील प्रेम अजूनही कायम आहे. जागतिक दूरदर्शन दिन दरवर्षी 21 नोव्हेंबर (World Television Day) रोजी साजरा केला जातो. जगात आणि भारतात टीव्हीचा प्रवास कसा सुरू झाला आणि टीव्हीवर प्रसारित होणारी पहिली मालिका कोणती होती हे आपण आज जाणून घेऊ.
टीव्हीचा शोध कोणी लावला?
1924 साली स्कॉटिश अभियंता जॉन लोगी बेयर्ड यांनी टीव्हीचा शोध लावला असे म्हटले जाते. यानंतर, 1927 मध्ये, फर्न्सवर्थने जगातील पहिला वर्किंग टीव्ही तयार केला. वर्किंग टीव्हीचा शोध लागल्यानंतर, 01 सप्टेंबर 1928 रोजी पत्रकारांसमोर सादर केला गेला. सुरुवातीला टीव्ही हा ब्लॅक अँड व्हाईट अवतारात होता, परंतु 1928 मध्ये जॉन लोगी बेयर्ड यांनी कलर टीव्हीचा शोध लावला. सार्वजनिक प्रसारण 1940 मध्ये सुरू झाले.
भारतात टीव्हीचा प्रवास कसा सुरू झाला?
भारतात टीव्हीचा प्रवास स्वातंत्र्यानंतर सुरू झाला. यात UNESCO ने महत्त्वाची भूमिका बजावली. UNESCO च्या मदतीने, 15 सप्टेंबर 1959 रोजी नवी दिल्ली येथे ऑल इंडिया रेडिओ अंतर्गत टीव्ही सुरू करण्यात आला आणि आकाशवाणी भवनमध्ये टीव्हीचे पहिले सभागृह बांधण्यात आले, ज्याचे उद्घाटन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाले. सुरुवातीला टीव्हीवर आठवड्यातून दोनदा नागरिकांची कर्तव्ये व हक्क, वाहतूक नियम, आरोग्य आदी विषयांवर एक तासाचे कार्यक्रम चालवले जात होते. 1972 मध्ये, टीव्ही सेवा मुंबई आणि अमृतसरपर्यंत पोहोचली आणि 1975 पर्यंत भारतातील 7 शहरांमध्ये त्याची सेवा सुरू झाली. 1980 पर्यंत टीव्ही देशाच्या सर्व भागात पोहोचला होता. भारतात पहिला रंगीत टीव्ही 15 ऑगस्ट 1982 रोजी आला.
हेही वाचा – तुमचे 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करा टॅक्स फ्री, 1 रुपयाही द्यावा लागणार नाही!
भारतातील पहिली टीव्ही मालिका
भारतातील पहिली टीव्ही मालिकेचे नाव होते ‘हम लोग’. ही मालिका चित्रपट अभिनेते अशोक कुमार यांनी बनवली होती. मनोज पाहवा, सीमा पाहवा, दिव्या सेठ शाह, सुषमा सेठ, राजेश पुरी, विनोद नागपाल, लवलीन मिश्रा, जयश्री अरोरा यांसारख्या अनेक कलाकारांनी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेचा शेवटचा भाग 17 डिसेंबर 1985 रोजी प्रसारित झाला होता. या मालिकेचे खूप कौतुक झाले होते. यानंतर हळूहळू टीव्हीवर इतरही अनेक मालिका दाखवण्याची प्रक्रिया सुरू झाली.
जागतिक दूरदर्शन दिनाचा इतिहास
नोव्हेंबर 1996 मध्ये, संयुक्त राष्ट्र संघाने पहिला जागतिक दूरदर्शन मंच आयोजित केला. अनेक मान्यवर माध्यमातील व्यक्तीही यात सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, देशात आणि जगात टेलिव्हिजनच्या वाढत्या महत्त्वावर चर्चा झाली आणि त्यासोबतच संयुक्त राष्ट्र संघाने दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी जागतिक दूरचित्रवाणी दिन साजरा करण्याची घोषणा केली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!