

जपानने जगातील सर्वात मोठा आण्विक फ्यूजन रिअॅक्टर (World Largest Nuclear Fusion Reactor) सुरू केला आहे. JT-60SA नावाचे हे विशाल मशीन टोकियोच्या उत्तरेकडील नाका येथील एका हँगरमध्ये बसवण्यात आले आहे. स्वच्छ आणि अमर्यादित उर्जेच्या शोधातील एक महत्त्वपूर्ण क्षण म्हणून याकडे पाहिले जाईल. सध्या जगातील सर्व अणु संयंत्रे फ्यूजनवर चालतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या फ्यूजन रिअॅक्टरमुळे मोठ्या प्रमाणावर, सुरक्षितपणे आणि कार्बनमुक्त ऊर्जा निर्माण करता येईल. हे मशीन एक सहा मजली-उंच टोकमाक असून ते 200 मिलियन डिग्री सेल्सिअस पर्यंत गरम होणारा प्लाझ्मा ठेवण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. टोकमाक हे असे उपकरण आहे जे टॉरसच्या आकारात प्लाझ्मा बंदिस्त करण्यासाठी शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र वापरते.
युरोपियन युनियन आणि जपान यांच्यातील हा संयुक्त उपक्रम सध्या फ्रान्समध्ये निर्माणाधीन आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक अणुभट्टी (ITER) साठी अग्रदूत म्हणून काम करतो. हा एक मैलाचा दगड आहे, जो ऊर्जा प्रणालींमध्ये क्रांती घडवू शकतो. JT-60SA मशीन बनवण्यासाठी 500 शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स लागले. ही माणसे युरोप आणि जपानमधील सुमारे 50 कंपन्यांकडून प्रोजेक्टवर काम करण्यासाठी आली आहेत. हे जगातील सर्वात प्रगत टोकमाक आहे.
न्यूक्लियर फ्यूजन
जेव्हा दोन अणू एकामध्ये एकत्र होतात तेव्हा न्यूक्लियर फ्यूजन घडते. हे प्रचंड प्रमाणात ऊर्जा सोडते. सूर्यामध्ये होणारी हीच प्रक्रिया आहे. फ्यूजन तेव्हाच होते जेव्हा अणू अत्यंत उष्णता आणि दाबाखाली असतात. हेच न्यूक्लियर फ्यूजन या शतकाच्या मध्यापर्यंत ऊर्जा पुरवतील. हे तंत्रज्ञान जगभर पसरेल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!