World Dairy Summit : ‘ती’ म्हैस इतकी खास का, जिचा उल्लेख खुद्द पंतप्रधान मोदींनी केलाय?

WhatsApp Group

World Dairy Summit : जवळपास अर्धशतकानंतर भारतात वर्ल्ड डेअरी समिटचं आयोजन होत आहे. या चार दिवसीय परिषदेत देश-विदेशातील प्रसिद्ध तज्ज्ञ आपले अनुभव शेतकऱ्यांशी शेअर करणार आहेत. यासोबतच दूध व्यवसायातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे, असा सल्लाही शेतकरी बांधवांना देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ग्रेटर नोएडा येथे जागतिक डेअरी समिटचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी गुजरातमधील कच्छ भागात आढळणाऱ्या ‘बन्नी’ म्हशींचा उल्लेख केला. देशी प्राण्यांच्या प्रजातींचा संदर्भ देत, पंतप्रधान मोदींनी विदेशी पाहुण्यांना विशेषतः बनी म्हशीबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न केला. आता प्रश्न पडतो की बनी म्हैस इतकी खास का? तिची वैशिष्ट्ये काय आहेत?

मोदी म्हणाले…

बनी म्हशीचा उल्लेख करत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची खासियत सांगितली. जागतिक डेअरी समिटला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की बनी म्हैस अत्यंत कठीण परिस्थितीतही टिकून राहण्यासाठी ओळखली जाते. ते म्हणाले, ”बन्नी म्हशी कच्छच्या वाळवंटात आणि तेथील परिस्थितीमध्ये इतक्या मिसळल्या आहेत की त्यांना पाहून कधीकधी आश्चर्य वाटते. कच्छच्या भागात दिवसा कडक सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे उन्हाचा तडाखाही जास्त असतो, अशा स्थितीत रात्रीच्या कमी तापमानात बन्नी म्हशी चरायला बाहेर पडतात. त्यावेळी पशुपालक त्याच्यासोबत नसतात. त्या स्वतःहून गावाजवळच्या कुरणात जातात. वाळवंटी भागात फार कमी प्रमाणात पाणी आढळतं, त्यामुळे या प्रजातीच्या म्हशींचं काम अगदी कमी पाण्यात होतं.”

हेही वाचा – Mazagon Dock Recruitment 2022 : माझगाव डॉकमध्ये १०४१ पदांसाठी भरती..! ‘असा’ करा अर्ज

या म्हशींची किंमत किती?

पीएम मोदी म्हणाले, ”बनी म्हैस रात्री १० ते १५ किलोमीटर दूर चरायला जाते. गवत चरल्यानंतर ही म्हैस आपल्या घरी परतते. शेतकरी तिला आणायला जात नाहीत. कुणाची बन्नी म्हैस हरवल्याचं क्वचितच ऐकायला मिळतं.” बन्नी ग्रास लँड हे पशुखाद्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. बन्नी म्हशीची जात अशी आहे, जी सर्व दूध उत्पादकांना खरेदी करायची आहे. बन्नी म्हशीची किंमत १ लाख ते ३ लाख रुपयांपर्यंत असू शकते. या म्हशीचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रजातीची म्हशी हिवाळा आणि जास्त उष्णता दोन्ही सहन करण्यास सक्षम आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment