World Cup 2023 : अफगाणिस्तानने वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडला हरवलं!

WhatsApp Group

World Cup 2023 ENG vs AFG : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असे म्हणतात. वर्ल्डकप 2023च्या 13 व्या सामन्यात धक्कादायक निकाल हाती आला आहे. अफगाणिस्तानने विश्वविजेत्या इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर अफगाण खेळाडूंनी कमाल करत इंग्लंडला 69 धावांनी हरवले. हॅरी ब्रूक वगळता इंग्लंडचे फलंदाज अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना सहज बळी पडले. ब्रूकने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. अफगाणिस्तानचा 3 सामन्यांमधला हा पहिला विजय आहे तर इंग्लंडचा 3 सामन्यांमधला हा दुसरा पराभव आहे.

जोस बटलरने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखालील अफगाण संघाने (ENG vs AFG) 49.5 षटकांत 284 धावा केल्या. प्रत्युत्तरात बटलर कंपनी 215 धावांत गडगडली. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक 66 धावा केल्या. त्याला मुजीब उर रहमानने बोल्ड केले. इंग्लंडकडून डेव्हिड मलानने 32 धावा केल्या तर जो रूट 11 धावा करून बाद झाला तर लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 10 धावांची खेळी केली. कर्णधार जोस बटलर 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आदिल रशीदने 20 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून युवा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले.

तत्पूर्वी, सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजच्या 57 चेंडूत 80 धावांच्या जोरावर अफगाणिस्तानने 284 धावा केल्या. त्यासाठी गुरबाजने 8 चौकार आणि 4 षटकारांसह 80 धावा केल्या. गुरबाजशिवाय इक्रम अलीखिलने 66 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांसह 58 धावा केल्या, तर खालच्या फळीतील अनुभवी मुजीब उर रहमानने 16 चेंडूत 28 धावांची आक्रमक खेळी केली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment