Free Travel : देशभरातील केंद्र व राज्य सरकारकडून देशातील महिलांना विविध सुविधा पुरविल्या जातात. आता सरकारने महिलांना बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा जाहीर केली आहे. होय… आता तुम्हाला बसने प्रवास करण्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. यासोबतच १ एप्रिलनंतर महिलांना बसच्या तिकिटांवर ५० टक्के सवलत मिळणार आहे. कोणते सरकार मोफत प्रवास करण्याची संधी देत आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.
३.५ कोटी महिलांना मिळणार सुविधा
८ मार्चला होळी आहे आणि त्यासोबतच आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, त्या पार्श्वभूमीवर महिलांना मोफत प्रवासाची सुविधा दिली जात आहे. राजस्थान सरकारने ही भेट राज्यातील महिलांना दिली आहे. सुमारे साडेतीन कोटी महिलांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार असल्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
७ मार्च रोजी मध्यरात्री १२ पासून उपलब्ध होणार ही सुविधा
राजस्थान रोडवेजच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिला आणि मुलींना भाडे द्यावे लागणार नाही, असे गेहलोत सरकारने सांगितले आहे. ही सुविधा ७ मार्चच्या मध्यरात्री १२ वाजेपासून सुरू होईल आणि ८ मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत जारी केलेल्या तिकिटांसाठी लागू असेल.
हेही वाचा – Indian Railways : तुम्हाला माहितीये…ट्रेनच्या डब्यावरील पिवळ्या रेषांचा अर्थ? जाणून घ्या!
सरकारी तिजोरीवर बोजा
मोफत सुविधा फक्त राजस्थानच्या हद्दीत उपलब्ध असेल. राजस्थानमधून दिल्ली, वाराणसी किंवा अन्य कोणत्याही राज्याच्या सीमेवर कोणतीही महिला गेल्यास तिला राजस्थान राज्याच्या सीमेपर्यंत भाडे द्यावे लागणार नाही आणि त्यापलीकडे प्रवासाचे भाडे द्यावे लागेल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर सुमारे ७.५० लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
१ एप्रिल नंतर भाड्यात ५०% सूट
यासोबतच राजस्थान सरकारने १ एप्रिल २०२३ पासून महिला प्रवाशांना बस भाड्यात ५० टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. १ तारखेनंतर हा लाभ सुरू होईल, असे सरकारने सांगितले आहे. यासाठी महिलांना त्यांचे आधार कार्ड बसेसमध्ये सादर करावे लागणार आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!