Viral Video : शिवीगाळ करणाऱ्या BJP नेत्याच्या कानाखाली मारली! महिलेचा व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group

Viral Video : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक भाजप नेता कार पार्क करण्यावरून झालेल्या वादानंतर शिवीगाळ करताना दिसत आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला जेव्हा त्याचे नाव विचारले तेव्हा तो ‘मी तुझा बाप आहे’ असे म्हणत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या बाचाबाची दरम्यान एका महिलेने या नेत्याला कानशिलात लगावली.

हे प्रकरण लखनऊचे असल्याचे सांगण्यात येत आहे. गाडीच्या पार्किंगवरून वाद सुरू झाला, गाडीवर भाजपचा झेंडा दिसत असून शिवीगाळ करणारी व्यक्ती भाजप नेते, माजी नगरसेवक अतुल दीक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. नाव विचारल्यावर दीक्षित शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यानंतर तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेने त्य़ांना कानशिलात लगावली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भाजप नेत्याला मारहाण करणारी महिला व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीची पत्नी असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – Petrol Diesel Price Today :  पेट्रोल डिझेल स्वस्त की महाग? वाचा तुमच्या शहरातील नवीन दर

एका ट्विटर यूजरने लिहिले की, उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता येऊन फक्त सात वर्षे झाली आहेत. अजून काही दिवस थांबा आणि मग बघा. दुसऱ्याने लिहिले, नेत्याला कानाखाली लगावत या महिलेने हे सिद्ध केले आहे की ही महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी सक्षम आहे. काहींनी या महिलेवर टीका केली आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment