नितीन गडकरींची मोठी घोषणा! मार्केटमध्ये येणार इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या

WhatsApp Group

Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, नवीन वाहने बाजारात आणली जातील, जी पूर्णपणे इथेनॉल इंधनावर चालतील. रविवारी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी अलीकडेच इलेक्ट्रिक वाहन लाँच करणाऱ्या मर्सिडीज बेंझच्या चेअरमनला भेटल्याचा प्रसंग आठवला. गडकरी म्हणाले, ”अध्यक्षांनी मला सांगितले की ते भविष्यात फक्त इलेक्ट्रिक वाहने बनवतील. आम्ही नवीन वाहने आणत आहोत, जी पूर्णपणे इथेनॉलवर चालतील. बजाज, टीव्हीएस आणि हिरो स्कूटर्स 100 टक्के इथेनॉलवर चालतील.”

गडकरी म्हणाले, “टोयोटा कॅमरी कार ऑगस्टमध्ये लॉन्च करणार आहेत, जी 100 टक्के इथेनॉलवर चालेल आणि 40 टक्के वीज निर्माण करेल. तुम्ही त्याची पेट्रोलशी तुलना केल्यास इथेनॉलची किंमत प्रति लिटर 15 रुपये असेल. कारण इथेनॉलची किंमत 60 रुपये आहे, तर पेट्रोलची किंमत 120 रुपये प्रति लीटर आहे. तसेच 40 टक्के वीजनिर्मिती होईल. त्यामुळे त्याची सरासरी किंमत प्रति लिटर 15 रुपये असेल.”

नितीन गडकरी यांनी यापूर्वी असेही म्हटले आहे की, भारताला लवकरच आपला वाहतूक उद्योग कार्बनमुक्त करण्याची गरज आहे आणि जैवइंधनाच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारताकडे आहे. भारतीय वाहतूक क्षेत्राची 80 टक्के ऊर्जेची गरज पेट्रोल आणि डिझेल यांसारख्या जीवाश्म इंधनांच्या आयातीतून भागवली जाते. यावर वर्षाला 16 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च होतो. सरकार इथेनॉलच्या वापराला प्रोत्साहन देत असल्याचे गडकरी म्हणाले होते. 2014 पूर्वी पेट्रोलमध्ये केवळ 40 कोटी लिटर इथेनॉल मिसळले जात होते, ते आता 400 कोटी लिटरवर पोहोचले आहे.

हेही वाचा – आनंदाची बातमी! लवकरच स्वस्त होणार लोन; RBI गव्हर्नर यांचे संकेत!

इथेनॉल हे प्रामुख्याने भात, मका आणि ऊस या पिकांपासून तयार केले जाते. अतिरिक्त ऊस, तांदूळ आणि मक्याच्या साठ्यांचा कार्यक्षम वापर करण्याबरोबरच बांबू आणि कापूस आणि पेंढा यासारख्या कृषी जैव-सामग्रीपासून दुसऱ्या पिढीचे जैवइंधन इथेनॉल तयार केले जाऊ शकते, असा गडकरींचा विश्वास आहे. यामुळे भारतातील इंधनाची परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे. कारण जैवइंधन इथेनॉल हे ऊस आणि मक्यासारख्या कृषी उत्पादनांपासून बनवले जाते. 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून त्यांचे सरकार इथेनॉलचे उत्पादन आणि वापराला सातत्याने प्रोत्साहन देत आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment