

मुंबई : सरकारच्या आदेशानंतर गूगलनं बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया (BGMI) हा क्रॅफ्टनचा लोकप्रिय गेम भारतात ब्लॉक केला आहे. देशात लोकप्रिय गेम PUBG वर बंदी घातल्याच्या एका वर्षानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीजीएमआय अॅपलवर गुरुवारी संध्याकाळपर्यंत उपलब्ध नव्हतं. भारतात गेल्या काही वर्षांत लाखो लोकांच्या पसंतीच्या PUBG या चिनी मोबाईल गेमवर सुरक्षेच्या दृष्टीनं बंदी घालण्यात आली होती. तथापि, हा गेम पुन्हा एकदा भारतात पुनरागमन करेल अशी सर्वांना अपेक्षा होती आणि PUBG गेमनंही या भारतात पुनरागमन केलं. मात्र, यावेळी हा गेम चिनी कंपनीद्वारे चालवला जात नसून BGMIया नावानं हा गेम लॉन्च करण्यात आला. त्यानंतरही, पुन्हा एकदा BGMIगेम गूगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरमधून गायब झाल्याचं दिसून आले.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडिया (BGMI) भारतात PUBG वरील बंदी एक वर्षानंतर काढून टाकण्यात आला आहे. चिनी प्रकाशक Tencent Games शी संलग्नतेमुळं PUBG वर बंदी घालण्यात आली होती. अहवालानुसार, सरकारनं यावर बंदी घातली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याच वेळी, आयटी मंत्रालयानं देखील या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा – VIDEO : मराठी चाहत्यासोबत गप्पा मारताना दिसली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती; रोहित म्हणाला…
गूगलनं ब्लॉक केला गेम
PUBG मोबाईलवर बंदी घातल्यानंतर BGMI गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आला होता. सध्या, Android आणि iOS वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनवर BGMI गेम डाऊनलोड करू शकत नाहीत. या संदर्भात, गूगलच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, गूगलने सरकारी आदेशानंतर भारतात बॅटलग्राऊंड मोबाइल इंडिया (BGMI) हा लोकप्रिय बॅटल-रॉयल गेम क्रॅफ्टनला ब्लॉक केला आहे.
हेही वाचा – ‘असं’ नाक असेल तर तुम्ही हुशार..! जाणून घ्या नाकाच्या आकारावरून तुमचं व्यक्तिमत्त्व
मानसिक आरोग्यावर परिणाम
दरम्यान, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की व्हिडिओ गेम खेळल्यानं लोकांच्या मानसिक-आरोग्यावर परिणाम होत आहे. एएफपीच्या अहवालानुसार, या अभ्यासात जगातील ३८,९३५ खेळाडूंचं सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात, या खेळाडूंना त्यांच्या मानसिक आरोग्याचं मूल्यांकन करण्यास आणि त्यांनी गेल्या दोन आठवड्यांत गेमिंगमध्ये घालवलेल्या वेळेची तुलना करण्यास सांगितलं होतं.
चीनकडून एक तास खेळ खेळण्याची परवानगी
रॉयल सोसायटीनं प्रकाशित केलेल्या या अभ्यासात असं म्हटलं आहे की, अनेकांनी व्हिडिओ गेम्सच्या व्यसनाच्या गुणांबद्दल आणि खेळाडूंच्या आरोग्याला होणाऱ्या संभाव्य हानीबद्दल चेतावणी दिली आहे. उल्लेखनीय आहे की चीनमध्ये शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मुलांना दररोज फक्त एक तास गेम खेळण्याची परवानगी आहे.