Viral Video : उत्तर प्रदेशातील मेरठमधील सेंट्रल मार्केटमध्ये एका पुरुषाला एका महिलेसोबत चालणे कठीण झाले. या पुरुषाच्या पत्नीने त्याला रंगेहात पकडले आणि रस्त्याच्या मधोमध मारहाण करण्यास सुरुवात केली. अदनान नावाचा व्यक्ती एका तरुणीसोबत मार्केटमध्ये आला होता आणि त्याच दरम्यान आयशा नावाची एक महिला तिथे पोहोचली, जी स्वत:ला अदनानची पत्नी सांगत होती. अदनानला दुसऱ्या महिलेसोबत पाहताच आयशाने भांडण सुरू झाले आणि दोघांनी एकमेकांना लाथा बुक्या मारण्यास सुरुवात केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत पती-पत्नीला पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्यात दोघांनी एकमेकांवर जोरदार आरोप केले. आयशा म्हणाली, की वर्षभरापूर्वी तिचे आणि अदनानचे लग्न झाले होते, काही काळानंतर दोघांमध्ये भांडणे सुरू झाली, त्यानंतर अदनानने तिला माहेरी सोडले, पण आज जेव्हा तिला समजले की अदनान दुसऱ्या महिलेसोबत बाजारात आहे. तेव्हा आयशा त्याचा पाठलाग करत पोहोचली.
हेही वाचा – मोबाईल फोन हरवलाय किंवा चोरीला गेलाय? लगेच करा ‘या’ ३ गोष्टी!
अदनानचे म्हणणे आहे की त्याने आयशाला घटस्फोट दिला आहे आणि घटस्फोट अद्याप झाला नसला तरी खटला सुरू आहे. आयशाने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अदनानने केला असून तो आपल्या महिला मैत्रिणीसोबत बाजारात होता. त्यामुळे आयशा काही लोकांसह तेथे पोहोचली आणि आधी गैरवर्तन केले आणि नंतर मारहाण केली.