Queen Elizabeth II On Sets Of Kamal Haasans Film : ब्रिटीश राजघराण्यातील एका युगाचा अंत झाला आहे. वयाच्या ९६व्या वर्षी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी जगाचा निरोप घेतला. एलिझाबेथ द्वितीय च्या मृत्यूनंतर, तिचा मोठा मुलगा चार्ल्स ब्रिटनचा नवा राजा होईल. राणी एलिझाबेथ हिनं वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी सिंहासन घेतलं आणि ७० वर्षे राज्य केलं. या दरम्यान त्यांनी १५ पंतप्रधान बनताना आणि पडताना पाहिले. राणी एलिझाबेथ-द्वितीय यांना सिनेमात खूप रस होता, असं म्हटलं जातं. राजघराण्यावर बनलेल्या अनेक चित्रपट आणि मालिकांचा ती एक भाग होती. त्यांच्या भारत दौऱ्यात त्यांनी कमल हासनच्या चित्रपटाच्या सेटवरही वेळ घालवला.
जेव्हा राणी एलिझाबेथ द्वितीय सेटवर पोहोचल्या
कमल हसन १९९७ मध्ये चित्रपट बनवत होते. नाव होतं मरुधनयागम. हा चित्रपट स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या वास्तविक जीवनातील स्वातंत्र्यसैनिक मरुधनायागम यांच्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबर १९९७ रोजी एमजीआर फिल्म सिटीमध्ये लॉन्च होणार होता. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना लाँचप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं.
Queen Elizabeth, longest-serving British monarch, dies https://t.co/BTBL7hxVxV pic.twitter.com/uFTy1vRYdh
— The Hill (@thehill) September 9, 2022
हेही वाचा – Asia Cup 2022 IND Vs AFG : विराटनं SIX मारून ठोकलं शतक..! संपवली १०२० दिवसांची प्रतीक्षा; पाहा तो क्षण!
राणी एलिझाबेथ द्वितीय यांनीही भारतीय चित्रपटाच्या सेटला भेट देण्यास स्वारस्य दाखवलं. तीही त्यांचं तिथं भव्य स्वागत करण्यात आले. एलिझाबेथ द्वितीय यांच्या आगमनापूर्वी त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व तयारी करण्यात आली होती. त्या सेटवर पोहोचताच कमल हसनची आधीची पत्नी सारिका यांनी आरती, तिलक आणि पुष्पहार घालून भारतीय रितीरिवाजांनुसार त्यांचं स्वागत केलं. एलिझाबेथ यांनी सेटवर पूर्ण २० मिनिटे घालवली. चित्रपटात युद्धाचा एक सीन आहे, ज्यामध्ये त्या एका छोट्या व्हिडिओमध्येही दिसल्या होत्या. त्यावेळी या सीनसाठी कमल हसननं दीड कोटी रुपये खर्च केल्याचं बोललं जात आहे.
एलिझाबेथ यांचव्यतिरिक्त, व्हीव्हीआयपी पाहुण्यांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एम करुणानिधी, एस जयपाल रेड्डी आणि काँग्रेस नेते मूपनार तसेच पत्रकार चो रामास्वामी यांचा समावेश होता. याशिवाय तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज शेवेलियर शिवाजी गणेशन आणि बॉलीवूडचे लोकप्रिय अभिनेते अमरीश पुरीही तिथं उपस्थित होते.
वाद कधी झाला?
त्यादिवशी केलेल्या भाषणात करुणानिधी यांनी या चित्रपटावर बोलताना ब्रिटीशांच्या संबंधांवरही मोकळेपणानं भाष्य केल्याचं सांगण्यात येतं. करुणानिधी यांनी मरुधनयागमला ब्रिटीश अधिकाऱ्यांनी कशी फाशी दिली हे सांगितलं. राणीनं मुख्यमंत्र्यांच्या विधानाकडं लक्ष दिलं की नाही याची पुष्टी झालेली नाही. एवढेच नाही तर राणीच्या भेटीनंतर यावरूनही वाद निर्माण झाला होता. अशा भारतीय चित्रपटाच्या लॉन्चिंगला ती का जाईल, ज्यामध्ये ब्रिटिशांचा निषेध करण्यात आला आहे, असं सांगण्यात आलं. राणी एलिझाबेथ द्वितीय या जगात नाहीत, परंतु त्यांची राजेशाही शैली इतिहासाच्या पानांमध्ये कायमची नोंदवली जाईल.