Noida Twin Tower Demolition : नोएडामध्ये ट्विन टॉवर पाडण्याचे प्रयत्न सुरू असताना एक व्यक्ती इमारतीत शांतपणे झोपली होती. नोएडा येथील एमराल्ड कोर्ट हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांचा समावेश असलेल्या ‘स्पेशल टास्क फोर्स’नं वेळेत सर्व लोकांना बाहेर काढलं होतं, परंतु ट्विन टॉवर पाडण्याच्या काही तासांपूर्वी, कोअर टीम घाबरून, कारवाईला लागली. घर रिकामे करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतरही एक माणूस त्याच्या अपार्टमेंटमध्ये झोपला असल्याची माहिती समोर आली.
घाईगडबडीत सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला वेळीच उठवलं आणि घराबाहेर काढलं. सुपरटेकनं बेकायदेशीरपणे हा ट्विन टॉवर बांधला होता. त्यानंतर रहिवाशांची संघटना न्यायालयात गेल्यानंतर नऊ वर्षांनी रविवारी (२८ ऑगस्ट) नियंत्रित स्फोटात तो पाडण्यात आला. ट्विन टॉवर पाडण्यापूर्वी विशेष तयारी करण्यात आली होती.
हेही वाचा – काही क्षणात ‘ट्विन टॉवर’ पडताच लोकांनी आनंदानं वाजवल्या टाळ्या; VIDEO पाहिला का?
३२ मजली इमारत ‘Apex’ आणि २९ मजली इमारत ‘Cyan’ काही सेकंदात जमीनदोस्त झाली. दोन्ही टॉवर पाडण्याची संपूर्ण योजना अत्यंत काळजीपूर्वक तयार करण्यात आली होती. एमराल्ड कोर्टमध्ये १५ निवासी टॉवर आहेत. शिवाय प्रत्येक टॉवरमध्ये ४४ अपार्टमेंट आहेत. यात सुमारे २५०० रहिवासी आणि १२०० वाहने आहेत. स्पेशल टास्क फोर्समध्ये सात सदस्य होते, जे स्वतः सोसायटीचे रहिवासी आहेत. सकाळी ७ वाजता, सोसायटीच्या विशेष टास्क फोर्सनं सुनियोजित प्रयत्नांचा एक भाग म्हणून निवासी टॉवर रिकामे केले होते. एमराल्ड कोर्टचे गौरव मेहरोत्रा यांनी टास्क फोर्सचं नेतृत्व केलं.
Noida Twin Tower demolition resembling the fall of Indian Media standards in last one decade! #TwinTowers pic.twitter.com/JmnWY6B9ig
— Vishal Verma (@VishalVerma_9) August 28, 2022
तो माणूस कुठं झोपला होता?
रविवारी सकाळी सातच्या काही वेळापूर्वी, एका सुरक्षा रक्षकानं टॉवरच्या वरच्या मजल्यावर एक माणूस असल्याची स्पेशल टास्क फोर्सला माहिती दिली. विशेष टास्क फोर्सचे सदस्य नरेश केशवानी यांनी मीडियाला सांगितलं, की टॉवर रिकामा करण्याच्या आमच्या दुहेरी पुष्टीकरण प्रक्रियेमुळं आम्हाला याची माहिती मिळाली. एक सोडून बाकी सर्व लोक टॉवरमधून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. ही व्यक्ती अपार्टमेंटमध्ये शांतपणे झोपली होती. टॉवर पाडण्याचा दिवस आणि वेळ त्याच्या डोक्यातून निघून गेली होती.
हेही वाचा – जगाला ‘खुळ’ लावणारी सात पोरं आणि त्यांची BTS Army..! वाचा काय आहे ही भानगड
केसवानी यांनी सांगितलं, ”कसं तरी सुरक्षा कर्मचार्यांनी त्या व्यक्तीला जागं केलं आणि सात वाजण्याच्या सुमारास त्यांना टॉवरमधून बाहेर काढण्यात आलं. दुहेरी पडताळणी प्रक्रियेमुळं झोपलेल्या व्यक्तीची ओळख पटवून त्याला सुरक्षितपणे बाहेर काढता येणं शक्य झालं.” या कारवाईसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह तब्बल ३७०० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. यासाठी २० कोटींचा खर्च करण्यात आला. हे दोन्ही टॉवर ‘एमराल्ड कोर्ट गृहनिर्माण’ प्रकल्पाचा भाग होते. या टॉवर्समध्ये ८५० फ्लॅट्स होते. ८ लाख चौरस फुटांवर टॉवरच बांधकाम झालं होतं. या कारवाईमुळं सुपरटेक कंपनीचं तब्बल ५०० कोटींचे नुकसान झालं आहे.