WhatsApp Chat Lock Feature : मेटाने व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर जाहीर केले आहे. यूजर्स या फीचरची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. कंपनी या फीचरची बीटा व्हर्जनवर बराच काळ चाचणी करत होती. आता ते सर्व यूजर्ससाठी लाइव्ह केले गेले आहे. हे फीचर युजर्सच्या चॅट सिक्युरिटीसाठी आहे.
आपला अनलॉक केलेला फोन कोणाच्या हाती लागला, तर तो तो चॅट्स ऍक्सेस करू शकत होता, पण आता असे होणार नाही. या परिस्थितीसाठी कंपनीने प्लॅटफॉर्मवर एक नवीन सुरक्षा फीचर जोडले आहे. त्याच्या मदतीने तुम्ही चॅट लॉक करू शकता.
या फीचरचा फायदा काय आहे?
व्हॉट्सअॅप चॅट लॉकचे फीचर सर्व यूजर्ससाठी आणले गेले आहे. त्याच्या मदतीने, यूजर्स समूह किंवा वैयक्तिक चॅट लॉक करू शकतात. या फीचरनंतर, फक्त तुम्ही तुमच्या चॅट्समध्ये प्रवेश करू शकाल. यासाठी तुम्हाला डिव्हाईस पिन किंवा बायोमेट्रिक्स लॉक वापरावे लागेल.
हेही वाचा – IPL 2023 : मुंबई इंडियन्सला 6 बॉल 11 रन्स डोईजड..! मोहसीन खाननं झुकवलं; ग्रीन-डेव्हिड फेल!
हे फीचर फिंगरप्रिंट लॉक किंवा फेस लॉकसह देखील कार्य करते. म्हणजेच, जर तुम्ही चॅट लॉक केले असेल तर ते उघडण्यासाठी तुम्हाला पिन, फिंगरप्रिंट किंवा फेस लॉकचा वापर करावा लागेल. तुम्ही चॅट लॉक करताच, WhatsApp त्या संभाषणातील मजकूर चॅट सूचनांमधून लपवते.
हे फीचर कसे कार्य करते?
- व्हॉट्सअॅपचे हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
- सर्वप्रथम तुम्हाला अॅप ओपन करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला कोणत्याही चॅटवर (पर्सनल किंवा ग्रुप) जावे लागेल.
- व्यक्ती किंवा ग्रुपच्या नावावर टॅप करावे लागेल.
- येथे तुम्हाला स्क्रोल करून खाली जावे लागेल तिथे तुम्हाला लॉक चॅटचा पर्याय मिळेल.
- आता तुम्हाला तुमचा पासवर्ड किंवा बायोमेट्रिक्स व्हेरिफाय करावे लागेल.
- अशा प्रकारे तुम्ही कोणतीही चॅट लॉक करू शकता.
हे फीचर सर्व यूजर्ससाठी आणले गेले आहे. येत्या काही दिवसांत हे फीचर सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. जर हे फीचर तुमच्या व्हॉट्सअॅपवर दिसत नसेल तर तुम्हाला अॅप अपडेट करावे लागेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!