रोहित शर्मा तसा टेक्निकल फलंदाज आहे. आक्रमक क्रिकेटमध्येही तो आपले शॉट्स अचूक टेक्निकनेच खेळतो. त्यापलिकडे रोहित कधीतरी ग्लेन मॅक्सवेलसारखे आडवे-तिडवे शॉट खेळेल, हे कोणी डोक्यातही आणत नसेल. पण बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर वेगळं घडलं. रोहितने अफगाणिस्तानच्या स्पिनरला स्विच हिट षटकार (IND vs AFG Rohit Sharma Switch Hit Six) ठोकला. चेंडू व्यवस्थित कनेक्ट झाल्याने रोहितही या शॉटनंतर हसू लागला. या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. पण जिथे गोलंदाजांना खूप घाम गाळावा लागतो, अशा चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय फलंदाजांनी सपशेल निराशा केली. ओपनर यशस्वी जयस्वाल (4) स्वस्तात बाद झाला. विराट कोहली आणि संजू सॅमसन यांना गोल्डन डक मिळाला. फॉर्मातला शिवम दुबेही एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये गेला. रोहित आणि रिंकू सिंहने डाव सांभाळला. रोहितने सुरुवातीला सावध आणि त्यानंतर व्हिंटेज व्हर्जन दाखवत फलंदाजी केली.
हेही वाचा – Duplicate Pan Card : हरवलेल्या पॅन कार्डसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रोसेस
दोन्ही संघांची Playing 11
भारत – यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि आवेश खान.
अफगाणिस्तान – रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झाद्रान (कर्णधार), गुलाबदिन नैब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झाद्रान, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी आणि फरीद अहमद मलिक.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!