

Stand Up Punishment To Staff : उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर कठोर कारवाई करत नोएडाच्या सीईओने निवासी भूखंड विभागाच्या कर्मचाऱ्यांना अर्धा तास उभे राहून काम करण्याचे आदेश दिले.
एका वृद्ध जोडप्याने आपली समस्या सोडवण्यासाठी प्राधिकरणाच्या निवासी भूखंड विभागाकडे धाव घेतली होती, मात्र तासनतास वाट पाहूनही त्यांचे काम होऊ शकले नाही, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सीईओंनी कर्मचाऱ्यांना ही शिक्षा सुनावली.
खरं तर, नोएडा प्राधिकरणाचे सीईओ लोकेश एम यांनी त्यांच्या कार्यालयात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर वृद्ध जोडप्याला बराच वेळ उभे असलेले पाहिले, तेव्हा त्यांनी तात्काळ निवासी भूखंड विभागाला त्यांची समस्या सोडवण्याची सूचना केली.
नोएडा अथॉरिटी में एक बुजुर्ग दंपति फाइल पास कराने के लिए भटक रहे थे, लेकिन सुनवाई नहीं हो रही थी।
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) December 17, 2024
CEO ने ये देख सभी कर्मचारियों को 30 मिनट तक खड़े होकर काम करने की सजा सुनाई !! pic.twitter.com/yUgMZlu4xE
हेही वाचा – बाईकवर बसलेला असताना आला हृदयविकाराचा झटका, 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
पण असे असूनही, 15-20 मिनिटांनी सीईओने पुन्हा सीसीटीव्ही पाहिल्यावर वृद्ध जोडपे उभे असल्याचे दिसले. त्यामुळे संतप्त झालेल्या सीईओंनी गृहनिर्माण विभाग गाठले आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाबद्दल त्यांना खडसावले.
सीईओंनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, तुम्ही उभे राहून काम कराल तेव्हाच तुम्हाला वृद्धांच्या समस्या समजतील, यानंतर त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना अर्धा तास उभे राहून काम करण्याची सूचना केली. सूचनांनुसार कर्मचाऱ्यांनी उभे राहून काम केले, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!