Kerala Highway Robbery : केरळमधील त्रिशूरमधील पिचीजवळ राष्ट्रीय महामार्गावर एक मोठा दरोडा टाकण्यात आला आहे. येथील एका व्यावसायिकाला दरोडेखोरांनी लक्ष्य केले आहे. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, जो कारच्या डॅशकॅमवरून रेकॉर्ड करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जणांच्या टोळीने एका कारसमोर थांबून अडीच किलो सोन्याच्या दागिन्यांसह दोघांचे अपहरण केले. त्याचवेळी उड्डाणपुलाच्या बाजूला बांधकाम सुरू असताना येथे दरोडेखोरांनी त्यांच्या गाड्या अडवून व्यावसायिकाला फिल्मी स्टाईलमध्ये लुटले.
हेही वाचा – यशस्वी जयस्वालचा ‘स्टनिंग’ कॅच, त्यावर रवी शास्त्रींची जबरदस्त कॉमेंट्री, पाहा Video
2.5 kg gold, being transported by car from Coimbatore to Thrissur, was stolen by a gang in three vehicles. #goldrobbery https://t.co/ciGUO7fW7u pic.twitter.com/qBIcZyGnuW
— Onmanorama (@Onmanorama) September 26, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांची टोळी 3 कारमधून आली होती. या टोळक्याने व्यावसायिकावर चाकू आणि इतर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. दरोडेखोरांनी त्यांना कारमधून खाली उतरण्यास सांगितले आणि त्यांना त्यांच्या कारमध्ये बसवले. यानंतर वाटेत दरोडेखोरांनी व्यापारी व त्याच्या मित्राला कारमधून खाली उतरवून पळ काढला.
पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार ही घटना 22 सप्टेंबर रोजी घडली. अरुण सनी आणि रोझी थॉमस यांचे अपहरण झाले. त्यांना मारहाण करून टोळीने 1.84 कोटी रुपयांचे दागिने लुटले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!