सुरू होतं मोटरसायकल ऑपरेशन, मुसळधार पावसात उभे राहिले भारताचे आर्मी चीफ, व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group

Indian Army Chief Manoj Pande : देशाची राजधानी दिल्लीत मान्सून दाखल झाला आहे. दिल्लीतील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासून इंडिया गेट ते नोएडापर्यंत पाऊस पडत आहे. दरम्यान, अशी बातमी आहे की, दिल्लीत लष्करप्रमुख (COAS) जनरल मनोज पांडे यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे मुसळधार पावसादरम्यान भारतीय लष्कराच्या D5 मोटरसायकल ऑपरेशनला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, लष्करप्रमुख D5 मोटरसायकल ऑपरेशनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी एका छोट्या मंचावर येतात. सैन्यातील इतर कर्मचारीही त्यांच्या मागे लागतात. दरम्यान, लष्कराचा एक कर्मचारी छत्री घेऊन त्यांच्याकडे जातो. पण ते मनाई करतात. यानंतर ते पावसात छत्रीशिवाय उभे राहतात.

हेही वाचा – “भारतासाठी संपूर्ण स्पर्धा….”, मायकेल वॉनने ICC वर लावले गंभीर आरोप; सेमीफायनलपूर्वी भडकला

दिल्लीतील पावसामुळे दिल्लीतील जनतेला कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळाला आहे. दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात पाऊस पडत आहे. सरिता विहार आणि दक्षिण दिल्ली परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. वातावरण आल्हाददायक झाले आहे. उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सकाळी थंडीचा अनुभव येतो. एकूणच दिल्ली-एनसीआरचे वातावरण थंड झाले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment